Viral Video: नातं कुठलंही असो; पण त्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. परंतु, अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांनी मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमधील मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक पत्नी तिच्या पतीला माराहाण करताना दिसत आहे.

हल्लीचा बदलणारा काळ बघता प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्यांचं प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका जोडपं भररस्त्यात मारामारी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भररस्त्यावर पती-पत्नीमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण झालं आहे आणि त्यामध्ये पत्नी पतीला मारहाण करायला सुरुवात करते. यावेळी ती पतीचा शर्ट पकडून खेचते आणि त्याला रस्त्यावर लोळवते. यावेळी पतीदेखील स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tuzya_mazya_premachi_bharari या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “बापरे, बायको डेंजर आहे याची”. दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “अशी बायको नको”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “भारतीय नारी सर्वांवर भारी”.