Viral Video : सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये निवांत शेताशेजारी बसलेल्या माणसाच्या मागून साप येताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सुदैवाने तो थोडक्यात वाचला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती शेताच्या शेजारी निवांत बसलेला आहे. हळूच त्याच्या मागून साप येताना दिसत आहे. जेव्हा साप त्या व्यक्तीला स्पर्श करतो तेव्हा तो व्यक्ती मागे वळून पाहतो आणि त्याला डोळ्यासमोर साप दिसतो. साप दिसताच व्यक्ती जागेवरुन उठतो आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा : जबाबदारीला वय नसतं! आठ वर्षांचा मुलगा एकटा चालवतोय पाणीपुरीचा गाडा; VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

india.yatra या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजर्सनी लिहिले आहे, “ही ओव्हर अॅक्टिंग आहे. व्हिडीओ ठरवून केलेला आहे” तर एका युजरने लिहिले, “शूट करणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओ इतका महत्त्वाचा होता का?” आणखी एका युजरने लिहिले आहे, ” शूट करणाऱ्याने त्या व्यक्तीला त्याच्या पाठीमागे साप आहे, हे का सांगितले नाही?”