Viral Video Shows How To Make Sutli Bomb Diwali Cracker : दिवाळी म्हटलं की आकाशकंदील, पणत्या, दारात रांगोळी, तोरण यांची सजावट केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो, त्यामुळे लोक दरवर्षी पणत्या लावून, फटाके वाजवून हा सण आनंदाने साजरा करतात. दिवाळीबरोबरच लग्नसराई, गणेशोत्सव, निवडणुकांचे निकाल यांसह अनेक समारंभांत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, या फटाक्यांतून निघणाऱ्या घातक धुरामुळे प्रदूषण होते, त्यामुळे पर्यावरणपूरक फटाकेसुद्धा फोडले जातात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे फटाके कसे बनवले जात असतील? नाही… तर आज आपण सुतळी बॉम्ब नक्की कसा बनवला जातो हे पाहणार आहोत.

आपण बाजारातून जे फटाके विकत घेतो आणि काही मिनिटांत जाळून टाकतो, पण ते बनवण्यामध्ये किती मेहनत असते याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. यासंदर्भातील एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिवाळीत फोडला जाणारा सुतळी बॉम्ब बनवला जात आहे. कारखान्याच्या आतील हा व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारा आहे आणि तो पाहिल्यानंतर लोक म्हणतात की हे काम खूपचं धोकादायक आहे. नक्की कशाप्रकारे बनवला जात आहे सुतळी बॉम्ब चला पाहूयात…

हेही वाचा…mpox : मंकीपॉक्स आजाराची लक्षणं काय? कोणत्या कारणांमुळे पसरतो ‘हा’ आजार? गूगल ट्रेंड्समध्ये ‘या’ शहरांत झालाय सर्वाधिक सर्च

व्हिडीओ नक्की बघा…

सूतळी बॉम्ब नक्की कसा बनवला जातो ?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सुरुवातीला एका छोट्याश्या खोक्यात गनपावडर भरून ती इवल्याश्या पेपरात गुंडाळून त्याला धाग्याने बांधून ठेवलं आहे. त्यानंतर या तयार खोक्याला संपूर्ण चॉकलेटी धाग्याने गुंडाळून घेतलं आहे. त्यानंतर या बॉम्बना टबमध्ये ठेवून हिरवा रंग दिला जातो आणि उन्हात सुकायला ठेवलं आहे. नंतर त्याच्या आतमध्ये एक गुलाबी रंगाची काठी रोवून, स्टिकर लावून त्याला पॅक केलं जात आहे. एका बॉक्समध्ये सहा ते सात सुतळी बॉम्ब ठेवून त्यांना विक्रीसाठी पाठवलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @factory_made_india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘सुतळी बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. कल्पना करा की, या सगळ्यात चुकून एखादी ठिणगीही पेटली तर जीवाला आणि मालमत्तेला किती धोका होऊ शकतो? तसेच कर्मचारी वर्गाने सुरक्षेसाठी हातात काहीही घातले नाही असे दिसत आहे. सगळी गनपावडर त्यांच्या हाताला लागलेली दिसते आहे. पण, एकूणच कामगारांची मेहनत कौतुकास्पद आहे.