Viral Video Shows Girl Shoot In Moving Train : सध्या अनेक जण सोशल मीडिया प्लॅटफॉमचा उपयोग त्यांचे वेगवेगळे कौशल्य दाखवण्यासाठी करू लागले आहेत. काही जण या रील फीचरचा उपयोग करून प्रसिद्धीसाठी करत शिखरावर पोहचले तर काही जण अगदीच याचा चुकीचा उपयोग करून ट्रोल सुद्धा झाले. कारण – आपण कुठे रील शूट करत आहोत याचे त्यांना भान उरत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी रील बनवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
व्हायरल व्हिडीओ श्रीलंकेचा आहे. वेगाने जाणाऱ्या ट्रेनच्या दरवाजाबाहेर एक तरुणी लटकताना दिसते आहे. तर सुरवातीला ट्रेनच्या दरवाजाखाली असणाऱ्या पायऱ्यांवर तरुणी उभी राहते. मागच्या डब्यातून एक अज्ञात व्यक्ती व्हिडीओ शूट करत असते. यादरम्यान ट्रेनच्या दरवाजाचा दांडा पकडून, हवेत लटकत ती रील बनवण्याचा आनंद लुटत असते. पण, तितक्यात ट्रेनमधून प्रवास करणारा एका अज्ञात प्रवासी ट्रेनचा दरवाजा बंद करत. मग नेमकं पुढे काय घडते व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
ट्रेनचा दरवाजा केला बंद (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, रील बनवण्यासाठी तरुणी ट्रेनच्या दरवाजाला लटकून उभी असते. पण, तितक्यात ट्रेनमधून प्रवास करणारा एका अज्ञात प्रवासी कंटाळून ट्रेनचा दरवाजा बंद करते. दरवाजा बंद करताच तरुणी दचकून खाली घसरते. पण, ती वेळीच स्वतःचा तोल सांभाळून घेते. त्यामुळे तिला कोणतीही दुखापत होत नाही. तोल सांभाळल्यामुळे तरुणीचा जीव वाचला आणि तिच्याबरोबर कोणताही अपघात झाला नाही. तुम्हीसुद्धा बघा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
अनेक जण रेल्वेतून प्रवास करत असतात. त्यामुळे अशा रील बनवणाऱ्यांनमुळे इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे व्हायरल व्हिडीओत एका अज्ञात प्रवाशाने रील बनवताना ट्रेनचे दार बंद करून थेट तरुणीला खाली उतरवले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @munevvernizamया इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून युजर्स टीका करू लागल्यामुळे तिने कमेंट सेक्शन बंद करून ठेवले आहे. पण, तरीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.