Viral Video Shows Photographer Desi Jugaad : आताच्या काळात कुठलाच कार्यक्रम हा फोटोग्राफरशिवाय पूर्ण होत नाही मग ते बारसं असो, लग्न असो किंवा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस. एखादा विशिष्ट कार्यक्रम आणखीन खास करण्याचं काम ‘फोटोग्राफर’ करतो. फोटोग्राफर सगळ्यांच्या आयुष्यातील खास क्षणांना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवतो. मग ते क्षण आपण कितीतरी वर्षं आपल्यासोबत जपून ठेवू शकतो. तर आज असाच एक पण मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये फोटोग्राफरने केलेला जुगाड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल एवढे तर नक्कीच…

कोणताही कार्यक्रम असो लहान मुले नेहमीच गोंधळ घालतात. मग नवरा-नवरी एंट्री करताना मध्ये येणे, हॉलमध्ये धावत-पळत सुटणे, जेवायला नको म्हणून रडून गोंधळ घालणे आणि अगदी आठवणीत राहील अशी गोष्ट म्हणजे फोटो काढताना कधीही कॅमेरात बघत नाहीत. तर आज हीच गोष्ट लक्षात ठेवून एका फोटोग्राफरने जुगाड केला आहे. आई-बाबांना आपल्या चिमुकल्याबरोबर फोटो काढायचा असतो. फोटो काढताना आपले मुलं एकतर रडणार किंवा इकडे-तिकडे बघणार याची कल्पना त्यांना असते.

व्हिडीओ नक्की बघा

लहान मुलाला फसवताय (Viral Video) :

तर यावर उपाय म्हणून फोटोग्राफरने जबरदस्त जुगाड केला आहे. आई-बाबा आपल्या चिमुकल्याला घेऊन स्टेजवर उभे असतात. त्यानंतर समोर फोटोग्राफर उभा असतो. फोटोग्राफर त्याच्या कॅमेराखाली मोबाईल ठेवतो आणि तिथे लहान मुलांचे गाणे लावतो. जेणेकरून चिमुकल्याचे लक्ष मोबाईल बघताना नकळत कॅमेराकडे सुद्धा जाईल आणि त्यांचा फॅमिली फोटो अगदी सुंदर येईल. मंडपात उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा क्षण स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zeeshanmk53 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘२०२५ टेक्नॉलॉजी’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. ‘अरे ही कल्पना तर मस्त आहे’ .’धन्यवाद फोटोग्राफर दादा’, ‘ही कल्पना देशाच्या बाहेर जाता कामा नये’, ‘ लहान मुलाला फसवताय’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली कमेंटमध्ये करताना दिसत आहेत.