Video Shows Sugarcane Seller’s Hand Gets Stuck In Machine : प्रत्येकाला वाटते की आपण श्रीमंत व्हावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्या. म्हणून घरातील वडील मिळेल ती नोकरी करतात, नोकरी बरोबर एक्स्ट्रा काम करतात, गुंतवणूक करतात आणि कुटुंबाचा खर्च भावगवतात. जेणेकरून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येईल. पण, हे सगळं करता करता अनेकदा ते स्वतःच्या जीवाशी खेळतात, गरजेपेक्षा जास्त काम करतात आणि मग स्वतःवर संकटे ओढून घेतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका माणसाचा हात मशीनमध्ये अडकला आहे.
रसवंतीगृहात उसाचा रस काढण्याची मशीन असते. त्या मशीनमध्ये एका माणसाचा हात अडकलेला दिसतो आहे. कदाचित तो या रसवंतीगृहाचा मालक आहे. तर उसाचा रस काढताना चुकून त्याचा हात मशीनमध्ये अडकला आणि त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. त्यांनी याठिकाणी पोलिसांना देखील बोलावून घेतले आणि त्यांच्या बरोबर रसवंतीगृहात उपस्थित सगळीच माणसे मशीन खोलण्यास सुरुवात करू लागली. स्क्रू खोलून त्यांनी माणसाचा हात बाहेर काढला.
कुटुंबासाठी पुरुषाची धडपड (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, मशीनमध्ये हात अडकल्यामुळे माणसाला प्रचंड वेदना होत असतात. रसवंतीगृहात उपस्थित पोलीस अधिकारी आणि सगळ्यांच्या मदतीने मशीनमधून हात बाहेर काढल्यावर रक्ताने त्याची बोटं माखलेली असतात. पोलीस अधिकारी हे पाहून त्याच्या हाताला कापड बांधतात. पण, तरीही त्यांच्या वेदना काही केल्या कमी झालेल्या दिसत नाही आहेत. तसेच या व्हिडीओने प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @titan_memes30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “कुटुंबासाठी पुरुषाची धडपड” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “मी व्हिडीओ बघून मला सुद्धा वेदना होत आहेत” , “मी पहिल्यादांच एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाला मदत करताना पहिले आहे”, “जेव्हा स्वतः पैसे कमवायला बाहेर जाल तेव्हा समजेल की, माझ्या वडिलांनी वडील म्हणून कर्तव्य कसे पार पाडले…” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत…