Video Shows Children Playing With Dogs : बालपणीचा काळ सुखाचा, हक्काचा, मौजमजा आणि आनंदाचा असतो. या वयात ना कोणती जबाबदारी, ना भीती, ना कोणाची अडवणूक असते. आपले लहानपणीचे अनेक फोटो आपण पुन:पुन्हा काढून पाहत असतो आणि ती वेळ नकळत पुन्हा जगत असतो. कारण लहानपण आयुष्यातील एक सगळ्यात आनंदी पर्व असते. त्यामुळे अनेकदा ‘आपण लहान होतो तेच ठिक होतो’ असे अगदी आपसूकच म्हणून जातो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
खेळ हा लहान मुलांचा सगळ्यात आवडता खेळ. खेळणी असून घरातील आईची भांडी घेऊन खेळणे, घरभर पसारा करणे लहान मुलांना भरपूर आवडते. लहानपणी कोण लहान, कोण मोठं याची जाणीव नसली तरीही प्रत्येकाला आपल्या वयाचे समजून त्याच्याबरोबर खेळण्याची मजा वेगळी असायची. तर आज व्हायरल व्हिडीओत असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले आहे. तीन मुले रस्त्याच्या कडेला बसलेली दिसत आहेत. एकमेकांचे हात धरून, वर्तुळ करून त्यांचा खेळ सुरु असतो.
लहान मुलं कधी काय करतील याचा खरंच काही नेम नाही. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, चिमुकल्यांनी श्वानाला त्यांच्या खेळात सामील केलं आहे. तुम्ही पाहिलं असेल वर्तुळात चौथा मित्र नाही तर श्वान बसला आहे. दोन चिमुकल्यांनी श्वानाचे दोन्ही पाय पकडून त्यालाही खेळात सामील केले आहे; जे पाहून श्वानाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही प्रेम, आदर आणि मित्रांची गरज असते हे व्हिडीओ दिसून आले. चिमुकले श्वानाबरोबर कोणता खेळ खेळत आहेत व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ladbible या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मुलांनी त्यांच्या मैत्रीत श्वानलही समाविष्ट केलं” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “असा ग्रुप सगळ्यांच्या नशिबी असावा”, “श्वानच खरे मित्र असतात”, “नक्की कोणता खेळ सुरु आहे माहिती नाही पण बघून खूपच मस्त वाटतं आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.