Viral Video: समाजमाध्यमांवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये कधी कोणी डान्स, तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. त्यावर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण व्हिडीओ रील्स बनविताना दिसतात. काही रील्स पाहून पोट धरून हसायला येतं, तर काही रील्स पाहून प्रेरणा मिळते. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती चिमुकली गोड लाजताना दिसतेय, जे पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसतायत.

लहान मुलं जितकी आगाऊ तितकीच ती निरागस असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये वेगळेपणा पाहायला मिळतो. त्यांच्यातील हा गोडवा नेहमी घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मनू नावाची चिमुकली तिच्यापेक्षा लहान बाळाच्या बाजूला उभी असून, यावेळी व्हिडीओतील पुरुष मनूला बघ बाळ तुझं ऐकतंय म्हणतो. यावर ती चिमुकली हसते आणि खूप गोड लाजते. यावेळी ती स्वतःचे दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून लाजते. चिमुकलीला असं लाजताना पाहून घरातील सर्व जण मंडळी खूप मोठमोठ्यानं हसायला सुरुवात करतात.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @yuvanshi_0027 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत दोन दशलक्षांनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरनं लिहिलंय की, “किती गोड लाजते”. तर आणखी एकानं लिहिलंय, “तिनं लाजून हात लावला आहे हे घरातल्या कुणाचं तरी एकदम भारी अनुकरण केलंय”. तर आणखी एकानं लिहिलंय, “कसली लाजली”. तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “खूप क्यूट आहे ही”.