Viral Video: लहान मुलांच्या नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. आताही असाच एक जरा हटके व्हिडीओ चर्चेत आलाय, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
सध्या सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं खूप चर्चेत आहे. या गाण्यावर अगदी परदेशातील कलाकारांपासून ते सामान्यांपासून प्रत्येक जण ठेका धरताना दिसत आहे. काही जण हे गाणं अधिक सुंदर आणि वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या दोन जुळ्या बहिणींचा असाच डान्स व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही त्यांचं कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन जुळ्या बहिणी एकमेकांसमोर उभ्या राहून ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सुरुवातीला त्यांचा डान्स पाहताना एक मुलगी आरशासमोर उभी राहून डान्स करतेय, असं वाटतं. परंतु त्यानंतर एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणी डान्स करत असल्याचे लक्षात येते. त्यांचा हा सुंदर डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pihumihu2013 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्सही करीत आहेत.