भिकारी हा शब्द जरी कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर अगदी घाणेरडे, फाटलेले कपडे घातलेली व्यक्ती, विस्कळीत केस, पायात चप्पल नाही, रस्त्याच्या कडेला बसून याचना करणारे, अशिक्षीत, कुठलाही आधार नाही असे व्यक्ती नाईलाजाने भीक मागत असतात. पण तुमचा विश्वास बसणार नाही, अशीच एक महिला भिकारी ही रस्त्याच्या कडेला बसून फाडफाड इंग्रजी बोलतेय आणि भर रस्त्यात ती इंग्रजीमधूनच भीक मागते. याहूनही आणखी आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला भिकारी चक्क कम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर आहे. या सगळं वाचून तुम्ही सुरूवातीला हैराण व्हाल, पण हे खरंय. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या महिला भिकारीची बरीच चर्चा रंगलीय. या महिला भिकारीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, अतिशय जुनाट साडी परिधान केलेली, केस विस्कटलेले, एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर भीक मागण्यासाठी बसलेली हा महिला भिकारी…या व्हिडीओमध्ये जेव्हढं दिसतंय फक्त त्यावर जाऊ नका. रस्त्यावर ये-जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या महिला भिकाऱ्याकडे बघत आहेत. ही व्हायरल महिला भिकारी सध्या सोशल मीडियावर कुतुहलाचा विषय ठरतेय. या व्हिडीओमध्ये तिच्या तोंडून फाडफाड इंग्रजी ऐकून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत.

या महिला भिकारीचं नाव स्वाती असं असून ती वाराणसीच्या अस्सी घाट परिसरात रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत असते. पण चक्क इंग्रजी भाषेतून भीक मागताना या महिला भिकारीला पाहून सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत. तिची इतकी स्पष्ट इंग्रजी भाषा ऐकून जेव्हढा धक्का बसलाय, त्याहूनही आणखी धक्कादायक म्हणजे ही महिला भिकारी साधी-सुधी नाही, तर तिने चक्क कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बहिणीच्या सासरी आला होता…रात्रभर ओलीस ठेवून मारहाण केली आणि मग पहाटेच जबरदस्तीने लग्न लावून दिलं

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : विद्यार्थीनीने शिक्षिकेच्या कानशिलात लगावली; नंतर शिवीगाळ करू लागली; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

आता तुम्ही विचार करत असाल, ती उच्च शिक्षीत आहे, तर मग रस्त्यावर भीक का मागतेय? तर या महिला भिकारीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीराची एक बाजू पॅरालाइज्ड झाली. तीन वर्षापूर्वी ती वाराणसीच्या अस्सी घाट परिसरात आली. शरारीची एक बाजू काम करत नसल्यानं तिला नोकरी गमवावी लागली. अखेर तिने रस्त्यावरून बसून भीक मागण्याचा पर्याय स्वीकारला. आज ही उच्च शिक्षीत महिला भिकारी इंग्रजी भाषेतच भीक मागून आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करतेय. ही महिला भिकारी मला पैसे नको पण हाताला काम द्या, अशी विनवणी करताना दिसून येतेय. स्वाभिमानाने जगण्याची इच्छा असुन सुद्धा तिला स्वाभिमानाने जगता येत नाही, या परिस्थितीमुळे तिला भीक मागावी लागतेय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळेत वर्गाबाहेर मस्ती करत होता, मग पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ शारदा अविनाश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर फाडफाड इंग्रजी बोलणारी ही महिला भिकारी पाहून अनेकांना हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यावाचून रहावत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेक जण या व्हिडीओवर कमेंट करत महिला भिकारीच्या टॅलंटचं कौतुक करत आहेत.