पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. पुणे आणि पुणेकरांची एकापेक्षा एक अफलातून किस्से नेहमीच सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरतात. कधी पुणेरी काका पुणेरी शैलीत उत्तर देतात तर कधी पुणेरी काकू नियम सांगून ते पाळायला इतरांना भाग पाडतात. कधी पुण्यातील रिक्षाचालक त्यांच्या अतरंगी रिक्षांमुळे चर्चेत येतात तर कधी लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीवर रोष व्यक्त करताना दिसतात. पुणेकरांचे जुगाडही त्यांच्यासारखे अगदी हटके असतात. सोशल मीडियावर अशाच एका पुणेकरांच्या जुगाडची चर्चा होत आहे जो पाहून नेटकरी चक्रावले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अचानक पावसाने हजेरी लावून पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. अशा परिस्थिती छत्री-रेनकोट न घेताच घराबाहेर पडलेल्या लोक मात्र अडकतात. पाऊस थांबल्याशिवाय बाहेर पडताच येत नाही पण हार मानतील ते पुणेकर कुठले. पुणेकर कोणत्याही परिस्थितीमध्ये काही ना काही जुगाड शोधून काढतातच. अशाच पावसाच अडकलेल्या पुणेकरांनी हटके जुगाड शोधला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका महामर्गावरील आहे जिथे भरपावसात वाहनांची ये-जा सुरु आहे. दरम्यान एका दुचाकीवर तीन तरुण बसलेले आहे ज्यांच्याकडे रेनकोट नाही. पावसापासून वाचण्यासाठी या तरुणाने हटके जुगाड शोधला आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण या तरुणांनी पावसात भिजू नये म्हणून चक्क कार झाकण्याचा कव्हर वापरला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि मागे बसलेल्या तरुणाने डोक्यावर कव्हर पकडला आहे तर मागे बसलेल्या तरुणाने हाताने कव्हर पकडला आहे. तिन्ही तरुण कव्हरच्या आत पूर्णपण झाकले गेले आहेत आणि त्यांचे फक्त पाय दिसत आहे. भरपावसात अशी दुचाकी चालवणे खरंतर अत्यंत धोकादायक आहे.बाजून जाणाऱ्या एका रिक्षात बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडिओ शुट केल्याचे दिसते.
इंस्टाग्रामलाunique.punekar नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. जेव्हा एक वाढीव पुणेकर रेनकोट घरी विसरतो तेव्हा….” कसा आहे जुगाड.
हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी हसण्याचे इमोजी टाकून कमेंट केली आहे.