Viral video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आवाक् करून सोडतात. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. तुम्ही भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मेट्रोतील भांडणे, लोकल ट्रेनमधील सीटवरून झालेली भांडणे. तसेच तुम्ही महिलांच्या, तरूणींच्या भांडाणाचे देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. यावेळी तरुणी चक्क पोलीस भरतीच्या ग्राऊंडवर भिडल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आतापर्यंत मुलींसाठी मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता यात मुली सुद्धा काही कमी नाहीत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलीस भरतीसाठी ज्या मैदानात तयारी करतात त्याठिकाणीच दोन तरुणींमध्ये खतरनाक भांडण झालं आहे. मैदानात धावताना चुकून एकमेकींचा धक्का लागल्यानं हा वाद सुरु झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या तरुणींनी अक्षरश: एकमेकींचे केस ओढले आहेत यावेळी त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचंही भान राहिलेलं नाहीये. यावेळी आजूबाजूचे सगळे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तरीही त्या एकमेकींवर तुटून पडल्या आहेत.

भांडताना या मुलांना कोणत्याच गोष्टींचे बान राहिलेले नाही. एकमेकींचे केस उपटत जोरदार भांडण चालू आहे. इतर लोक भांडण भांबवण्याचा प्रयत्न दैखील करत आहेत. पण या दोघी एकमेकींना सोडायला अजीबात तयार नाहीत. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ old_is_gold.._ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “का बरं बघवत नसेल एकमेकींची प्रगती” असं लिहलं आहे. तर एकानं प्रतिक्रिया देत “अगं काहीतरी भान ठेवा” असं म्हंटलंय.