scorecardresearch

Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…

वादळात अडकलेल्या आलिशान बोटीतील लोकांचे हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू होते.

sea ​​storm Viral Video
सोशल मीडियावर आपणाला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून अंगावर शहारे येतात. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर आपणाला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. जो समुद्रातील एका मोठ्या लक्झरी बोटचा आहे. वादळामुळे किंवा पावसाच्या वातावरणामध्ये समुद्रात अनेकदा मोठमोठ्या लाटा उसळतात. सध्या अशीच एक बोट वादळामुळे उसळणाऱ्या लाटांमध्ये अडकल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय ती बोट उंच लाटांवर एखाद्या चेंडूप्रमाणे हालताना दिसत आहे. त्याचवेळी अचानक एक मोठी लाट येते आणि बोट समुद्रात पलटी झाल्याचं दिसत आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय या धक्कादायक आणि भयंकर दृश्य पाहून अनेकजण तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल शेअर करत आहेत.

अनेकदा सागरी प्रवास हा खूप धोक्याचा ठरतो. कारण समुद्रात सतत बदलणारे हवामान कधीही भयानक रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत समुद्रात वादळ आले की मोठमोठी जहाजंही त्यात अडकतात, ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वादळात अडकलेल्या आलिशान बोटीतील लोकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवण्याचे काम सुरू असतानाच एक मोठी लाट येते आणि बोटला पाण्यात बुडवते.

हेही पाहा- आमदारांची तारांबळ अन् ट्विटरवर मिम्सचा पाऊस…, मुंबईतील मेघराजाची वेगवेगळी रुपं पाहिलीत का?

…अन् क्षणात बोट बुडाली –

हेही पाहा- “दिवसा किस आणि रात्री…” भरदिवसा महिलेला जबरदस्ती किस करणाऱ्या ‘सिरियल किसर’चा Video व्हायरल

लाटांनी बुडवली बोट –

@OnlyBangersEth नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, समुद्रातील वादळामुळे उंच लाटा उसळतात ज्यामुळे बोट समुद्रात उलटते आणि लोक समुद्रात पडतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय हे दृश्य अतिशय भयानक असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत ३.५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर ८० हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्याला खूप मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करत हे दृश्य खूप भयानक असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने वादळामध्ये समुद्राच्या लाटांवर कधीही स्वार होऊ नये असंही लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 14:15 IST

संबंधित बातम्या