Stunt video viral: आजकाल लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात. लोक फोटो, व्हिडीओ बनवत ते इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. आपला जीवही धोक्यात घालायला कमी करत नाही. यामध्ये लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका तरुणी रील बनवण्यासाठी चक्क मुंबईतील धावत्या लोकलच्या बाजूला उभी आहे, तर दुसरी एक महिला प्लॅटफॉर्मवर ट्रेन येत असताना व्हिडीओ बनवत आहे. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अशा लोकांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

हे धोकादायक प्रकार पाहून मुंबईकर मात्र प्रचंड संतापलेले दिसत आहेत. या महिला स्वत: बरोबरच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालत असल्याचं दिसत आहे. हे इतकं भयानक आहे की बघूनत अंगावर काटा येतो. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत तुम्ही बाजारात, मेट्रोमध्ये डान्स करणाऱ्यांचा व्हिडिओ पाहिला असेल. मात्र, रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याआधीही रेल्वेस्थानकावर आणि ट्रेनच्या आतमध्ये ही तरुणी मंडळी बाकीच्या प्रवाशांची पर्वा न करता, अगदीच विचित्र पद्धतीने व्हिडीओ शूट करताना दिसून आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक परिसरात रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करत आहेत.

Crashed the new car on the first day
नाद केला; पण वाया गेला… नव्या गाडीला घरी आणण्याआधीच लावली अशी वाट; VIDEO पाहून युजर्स म्हणाले…
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे रुळाच्या बाजूला महिला उभी आहे. जशी ट्रेन येते तशी ही महिला ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना हातवारे आणि नाचून दाखवत आहे. मात्र यावेळी तिचा तोल जाऊन अपघात होण्याचीही भीती आहे. तर दुसरीकडे या व्हिडीओंमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता जी, पश्चिम मार्गावरील मालाड रेल्वे प्लॅटफॉर्मवर नाचतेय, तेवढ्यात पाठीमागून गाडी येते अन् तिच्यामुळे खाली उतरणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: खळबळजनक! भटक्या कुत्र्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला; ‘ती’च्या धाडसामुळे बचावले तरुणाचे प्राण

सोशल मीडियावर ही पोस्ट @mumbaimatterz यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट रिपोस्ट करून अनेक युजर विविध प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.