सोशल मीडियावर अनेक विचित्र स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी कोणी बाईकवर स्टंट करताना तर कोणी रील बनवण्यासाठी रेल्वेच्या रुळावर डान्स करत व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण असे स्टंट करणे अनेकदा जीवघेणे ठरु शकते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल यात शंका नाही.
आजकाल सोशल मीडियावर अनेक लोकांनी धोकादायक स्टंट केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच दोन तरुणांच्या जीवघेण्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. कारण या व्हिडीओत दोन तरुण आडवे पडून भरधाव वेगाने बाईक चालवत असतानाच त्यातील एकाला कारने जोरदार धडक दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुण बाइकवर विचित्र आणि धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. ते आडवे पडून बाईक चालवत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते ज्या रस्त्यावर हा स्टंट करत आहेत तिथे अनेक वाहणे ये-जा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्टंट करणाऱ्या या मुलांच्या मागून येणाऱ्या कारमधील काही लोक त्यांचा व्हिडिओ बनवत असल्याचंही दिसत आहे. यावेळी स्टंट करणाऱ्या दोन मुलांपैकी एक पुढे जातो तर दुसरा मागे राहतो. याचवेळा एक कार भरधाव वेगाने येते आणि त्या मुलाला मागून धडकते. त्यामुळे या मुलाला गंभीर दुखापत झाल्याचा अंदाज लावता येऊ शकतो.
हेही पाहा- अंडी शिजवायला गेली अन् संपुर्ण चेहरा… महिलेचा विचित्र अपघात होतोय Viral; नेमकं घडलं काय?
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे तर ३२ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यात मुलाचा मृत्यू झाला असावा, असे काही लोकांनी अंदाज वर्तवला आहे. तर एका नेटकऱ्याने कॅमेऱ्यात दिसण्यासाठी लोक स्व:चा जीव गमवतात, अशी कमेंट केली आहे.