Viral Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील, यात अनेक व्हिडीओ मेट्रोचेसुद्धा असतात. अनेकजण धावत्या मेट्रोत फॅशन शो आयोजित करतात. व्यायाम किंवा अनोखे स्टंट करताना दिसून येतात; तर भांडण, अश्लील कृत्ये करतानासुद्धा अनेक प्रवासी दिसतात. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मेट्रोत संगीताची मैफिल रंगली आहे. चार तरुण मिळून मेट्रोत एक सुंदर गाणं सादर करताना दिसून आले आहेत.
व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा आहे. मेट्रोत एक चार तरुणांचा ग्रुप उभा आहे आणि प्रवाशांच्या गर्दीत तरुणांचा ग्रुप गाणं गाताना दिसत आहेत. चार तरुणांमधील एक तरुण सहातारी सतार (Guitar) गिटार वाजवत आहे, तर बाकीचे तीन तरुण गिटारच्या तालावर सुंदर गाणं सादर करत आहेत. गाणं गाणाऱ्या तरुणाचा आवाज ऐकून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल. मेट्रोत गाणं सादर करताना पाहून अनेकजण तरुणांकडे कुतूहलाने बघत आहेत, तर काहीजण हे क्षण मोबाईलमध्ये टिपून घेत आहेत. अशाप्रकारे मेट्रोत तरुणांची संगीताची मैफिल रंगली आहे. तरुणांनी सादर केलेलं गाणं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच..




हेही वाचा… कहरच केला राव! चक्क खूर्चीवर बसून रिक्षा चालवतोय हा माणूस; VIRAL फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हिडीओ नक्की बघा :
मेट्रोत रंगली गाण्याची मैफिल :
बॉलिवूड अभिनेता,सैफ अली खानच्या ‘लव आज कल’ चित्रपटातील ‘आज दिन चढेया’ हे गाणं आजवर तुम्ही एकदा तरी ऐकलं असेल; तर आज या तरुणांनी अगदी सुंदर आवाजात मेट्रोत हे गाणं सादर केलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला मुलांचा एक ग्रुप दिसेल. एका तरुणाच्या हातात गिटार आहे. त्यांच्यापैकी एक तरुण ‘आज दिन चढेया’… हे हिट गाणं गातो आहे. ‘मंगा जो मेरा है जाता क्या तेरा है…’ हे गाताच त्याचे मित्र त्याला साथ देतात आणि गाणं म्हणण्यास सुरवात करतात आणि संपूर्ण मेट्रोचे वातावरण बदलून जाते. जवळ उभे असलेले सर्व प्रवासी त्या माणसाचे गाणे लक्षपूर्वक ऐकू लागतात. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला तरुणांचा हा परफॉर्मन्स खूप आवडतो.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ @arjunbhowmick या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकजण तरुणाच्या आवाजाचे कौतुक करताना दिसत आहेत. काहीजणांनी तरुणाचा आवाज ऐकून त्याला सोशल मीडियावर फॉलोसुद्धा केलं आहे, असेसुद्धा सांगत आहेत. तसेच अनेकजण व्हिडीओतील खास गोष्टी कमेंटमध्ये नमूद करताना दिसत आहेत; तर काहीजण तरुणांना मेट्रोत गाणं गाताना बघून विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.