मित्रांनो, एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत कालमापन किंवा दिनदíशकेवर प्रश्न विचारले जातात. अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी अवघड वाटतात. मात्र, खालील नियमांचा योग्य अभ्यास केल्यास आपण कमी वेळात अचूक प्रश्न सोडवू शकतो.
सामान्य वर्ष :
१) एकूण दिवस ३६५ म्हणजे एकूण आठवडे ५२ + १ दिवस जादा.
२) सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार १ दिवसांनी पुढे जातो.
    १ जानेवारी १९९७ ला मंगळवार असल्यास १ जानेवारी १९९८ ला बुधवार असेल.
३) सामान्य वर्षांत फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस येतात. सामान्य वर्षांत फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वारच पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो.
४) सामान्य वर्षांत १ जानेवारीला असणारा वार ५३ वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी ५२ वेळा  येतात.
५) ३० दिवसांच्या महिन्यांनंतर पुढील महिन्यात त्या तारखेला येणारा वार दोन दिवसांनी तर ३१ दिवसांच्या महिन्यांनंतर पुढील महिन्यात त्या तारखेचा वार तीन दिवसांनी पुढे जातो.
६) १ जानेवारीला जो वार येतो तोच वार ३१ डिसेंबरला असतो.
लीप वर्ष :
१)    ज्या वर्षांला ४ ने नि:शेष भाग जातो आणि ज्या वर्षांच्या शेवटी दोन शून्य असल्यास ४०० ने नि:शेष भाग जातो ते लीप वर्ष होय. उदा. १९८०, १९९६, २०००, १६०० इ. परंतु १८०० लीप वर्ष नाही.
२)    लीप वर्षांत एकूण ३६६ दिवस असतात. तसेच ५२ आठवडे + २ दिवस.
३)    लीप वर्षांत २ दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार २ दिवसाने पुढे जातो.
    उदा. १ जानेवारी २००४= गुरुवार, तर १ जानेवारी २००५= गुरुवार + २ = शनिवार
४)    लीप वर्षांत १ आणि २ जानेवारीचे वार वर्षांत ५३ वेळा तर इतर वार ५२ वेळा येतात.
५) १ जानेवारीला जो वार असतो त्याचा पुढचा वार ३१ डिसेंबरला असतो.
६)    ७ दिवसांचा एक आठवडा असतो, म्हणून प्रत्येक आठवडय़ाने तोच वार पुन्हा येतो.
    उदा. १ तारखेला जो वार तोच वार ८, १५, २२, २९ तारखेला येतो.
संपूर्ण वर्षांतील दिवस :
जानेवारी = ३१ दिवस. म्हणजेच ४ आठवडे + ३ दिवस याप्रमाणे पुढील महिन्यांमध्ये आठवडे + जास्तीचे किती दिवस ते नमूद केले आहे- जानेवारी- ३, फेब्रु.-०/१, मार्च- ३,
एप्रिल- २, मे- ३, जून- २, जुल- ३, ऑगस्ट- ३,
सप्टेंबर- २, ऑक्टोबर- ३, नोव्हेंबर- २, डिसेंबर- ३
महत्त्वाची उदाहरणे :
१)    एका लीप वर्षांतील स्वातंत्र्यदिन  शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताकदिनी कोणता वार असेल?
    अ) रविवार    ब) गुरूवार    क) शुक्रवार    ड) शनिवार
स्पष्टीकरण : १८ ऑगस्टला जर शुक्रवार असेल तर सर्वप्रथम आपण १५ जानेवारीचा वार काढू.
    जादा दिवस = जुलचे ३ + जूनचे २ + मे ३ + एप्रिल २ + मार्च ३ + फेब्रुवारी १ + जाने. ३ = १७ दिवस जादा
    म्हणून १७/७ = बाकी ३ म्हणजे शुक्रवारच्या मागे ३ दिवस = मंगळवार म्हणजे १५ जानेवारीला मंगळवार येतो म्हणजे २२ जानेवारीला (मंगळवारच+४) असेल म्हणून २६ जानेवारीला शनिवार असेल.
२)    २३ मार्च २००५ रोजी बुधवार आहे तर ९ सप्टेंबर २००५ ला कोणता वार असेल?
    १) मंगळवार    २) गुरुवार    ३) शुक्रवार    ४) सोमवार
स्पष्टीकरण : पद्धत एक : २३ मार्च ते ९ सप्टेंबर पर्यंतचे दिवस = ८ + ३० + ३१ + ३० + ३१ + ३१ + ९ = १७० दिवस
    म्हणून १७०/७ = २४ आठवडे + २  दिवस
    जर २३ मार्चला बुधवार असेल तर
    ९ सप्टेंबरला बुधवार + २  = शुक्रवार असेल.
    पद्धत दुसरी : २००५ हे सामान्य वर्ष असल्याने  जादा दिवस   = ८ + २ + ३ + २ + ३ + ३ + ९ = ३०
    (जादा दिवसांचा तक्ता अभ्यासावा)
    म्हणून ३०/७ = ४ आठवडे + २
    जर २३ मार्चला बुधवार असेल तर
    ९ सप्टेंबरला बुधवार + २ = शुक्रवार असेल.