विरार : वसईत एका ७ वर्षीय बालकाचा इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही बॅटरी चार्जिंगला ठेवली असताना तिच्यात स्फोट होऊन हा मुलगा जखमी झाला होता. उपचारा दरम्यान सातव्या दिवशी त्याचा मृ्त्यू झाला. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : सोलापूरात अजित पवारांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

हेही वाचा >>> अकोला : घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; अकोला जिल्ह्यातील पातूर येथील धक्कादायक प्रकार

वसई पुर्वेच्या रामदास नगर परिसरात राहणारे शाहनवाज अंसारी हे २३ सप्टेंबर रोजी रात्री घरी नेहमीप्रमाणे आल्यावर त्यांनी आपल्या इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी दिवाणखान्यात चार्जिंगला ठेवली आणि झोपायला गेले. यावेळी दिवाणखान्यात त्यांची आई आणि ७ वर्षीय शाबीर अंसारी हा झोपला होता. सकाळी सोडेपाच च्या दरम्यान अचानक बॅटरीत स्फोट झाला आणि त्यात शाबीर जखमी झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्यात घराचे मोठे नुकसान झाले. शाबीरला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सात दिवसाच्या उपचारानंतर ३० सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात माणिकपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर घटनेने इलेक्ट्रीक बाईकच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या अगोदरही शहरात इलेक्ट्रीक बाईकच्या दुर्घटना समोर आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करताना सावधता बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.