News Flash

सचिन सातपुते याचा अर्ज फेटाळला

अशोक लांडे खूनप्रकरणात आरोपी सचिन सातपुते याचा गुन्हय़ातून वगळण्यासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला. दरम्यान, आणखी एक आरोपी सचिन भानुदास कोतकर याच्या

| September 28, 2013 01:58 am

अशोक लांडे खूनप्रकरणात आरोपी सचिन सातपुते याचा गुन्हय़ातून वगळण्यासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला. दरम्यान, आणखी एक आरोपी सचिन भानुदास कोतकर याच्या गैरहजेरीमुळे गुन्हय़ाचे दोषारोप निश्चितीचे कामकाज न्यायालयात झाले नाही. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी हा आदेश दिला. सातपुते याने गुन्हय़ातून वगळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर त्याचे वकील प्रसन्न जोशी तसेच जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांचा युक्तिवाद पूर्वीच पूर्ण झाला होता, आज हा अर्ज दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने फेटाळला.
दरम्यान, आरोपी सचिन कोतकर याने वकील महेश तवले यांच्यामार्फत अर्ज करत, वडील भानुदास कोतकर यांच्या जामीनअर्जासाठी आपण आज दिल्लीत असल्याने गैरहजर राहण्यासाठी परवानगी मागितली, त्यामुळे आरोप निश्चितीवरील सुनावणी दि. ७ रोजी ठेवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:58 am

Web Title: application rejected of sachin satpute in ashok lande murder case
Next Stories
1 अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत
2 जावयाकडून सास-याचा खून
3 धनादेश वटला नाही जामीनदारास १ कोटीचा दंड
Just Now!
X