सामान्य संगणक वापरकर्त्यांच्या आधुनिक युगातील गरजा लक्षात घेऊन ‘डेल’ कंपनीतर्फे ‘सोल्युशन फॉर सक्सेस’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात ‘ईएसडीएस’ डाटा सेंटर कंपनीचा महत्त्वाचा सहभाग होता. या वेळी संगणक वापरकर्त्यांच्या विस्तारलेल्या वापराचा आढावा घेऊन कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा वितरक आणि ग्राहकांसमोर सादर करण्यात आल्या. आयटी क्षेत्रात कार्यरत देशातील नामांकित कंपन्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
संगणक बनविणारी कंपनी म्हणून ओळखअसलेल्या ‘डेल’ने केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता आता आयटी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक सेवा देण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या १५ सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात क्वेस्ट, वेस, सॉनिक वॉल, फोर्स १० या जागतिक पातळीवरील सेवांचा समावेश आहे. सव्‍‌र्हर, स्टोअरेज, नेटवर्किंग आणि सिक्युरिटी या पातळ्यांवर स्पर्धात्मक रीतीने सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ‘ग्लोबल कमर्शियल’चे संचालक आणि सरव्यवस्थापक अजय कौल यांनी याबाबतची माहिती दिली. भारतातील वेगाने विस्तारित होणारी बाजारपेठ पाहता आता आम्ही आणखी विस्तृत स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी सज्ज झालो आहोत. देशातील ११ निवडक शहरांमध्ये या सेवा पुरविण्यासाठी विशेष संघ कार्यरत असतील आणि त्यांच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची योजना आहे. संगणकापासून ते व्यावसायिक वापराच्या संगणकीय उपकरणाचा त्यात समावेश असेल. ‘डेल’ एन्डरप्राइज सोल्युशन्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सेवांमध्ये माहिती साठविण्यासाठी ‘डेल डाटा फ्लुइड आर्किटेक्ट’, ऊर्जा बचत, वेग आणि सुरक्षा यांना प्राधान्य देणारे १२ व्या पिढीतील सव्‍‌र्हर, एक व्यवस्थापन व्यावसायिकांसाठी ‘व्ही स्टार्ट ५०’ ही सुविधा, ‘सॉनिक वॉल’, फोर्स १०, डेल केस, क्लाउड बेस्ड क्लिअरिटी, सिक्युअर्ड वर्ल्ड ही सुरक्षा सेवा आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.  ‘ईएसडीएस’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष सोमाणी यांनी डेलने आयोजिलेल्या उपक्रमात ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी योग्य पावले उचलणे व आयटी क्षेत्रातील उत्पादकता अधिकाधिक वाढविणे त्यामुळे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यात ईएसडीएस आपल्या ग्राहकांना या सेवा देण्यात सदैव तत्पर राहणार असल्याचे सोमाणी यांनी नमूद केले.