चौंडी तलावात कुकडीचे पाणी
जामखेड तालुक्यातील चौंडी तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार राम शिंदे, जिल्हाघिकारी संजीवकुमार व कुकडीचे कार्यकारी अभियंता आर. के. नितुलकर यांनी टिकाणाची पाहणी केली. प्रभारी तहसीलदार जैयसिंग भैसडे, कर्जतचे उपसरंपच नामदेव राउत यावेळी उपस्थित होते.  जामखेड शहरासह तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्यात टँकर भरण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे कुकडीचे पाणी चौंडी येथील तलावात सोडावे व तिथून जामखेड शहरासह तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कुकडीचे पाणी मिळावे हे या तालुक्यातील जनतेचे अनेक पिढयांचे स्वप्न आहे. ते यावेळी तरी पुर्ण होईल असे वाटत असले तरी  काही झारीतील शूक्राचार्य यामध्ये राजकारण आणून पाणी देण्यात अडचण करीत आहेत. जामखेड तालुक्यातील चौडीं येथे कर्जत तालुक्यातील रूक्मिणी खिंडीतून पाणी सोडणे जास्त योग्य व पाण्याचा कमी अपव्यय करणारे आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी व इतरांच्या पथकाने पाहणी केली.  आमदार राम शिंदे यांनी या पथकाला पाणी जाण्याचे सर्व मार्ग दाखवले. त्यानंतर अधिकाऱ्यांना जिथे शंका आहे त्यावर चर्चा करून उपाय सुचवले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडयात जामखेडकरांना कुकडीचे पाणी मिळले असे वाटते.