मंगळवेढय़ातील ज्येष्ठ पत्रकार महादेव वामन वेदपाठक (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, दोन कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवेढय़ाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार दयानंद वेदपाठक यांचे ते वडील होत.
महादेव वेदपाठक यांनी सुमारे ४५ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात सेवा केली. दिवंगत झुंजार संपादक रंगा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वेदपाठक यांची जडणघडण झाली होती. त्यांच्या सुंदर हस्ताक्षराची दखल तत्कालीन उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी घेत त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
पत्रकार महादेव वेदपाठक यांचे निधन
मंगळवेढय़ातील ज्येष्ठ पत्रकार महादेव वामन वेदपाठक (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, दोन कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवेढय़ाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार दयानंद वेदपाठक यांचे ते वडील होत.
First published on: 26-12-2012 at 09:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior journalist mahadev vedpathak is no more