अणुशक्ती नगर
२५ टक्के डोंगराळ गावे व ११ गावठाणे असलेला हा मतदारसंघ. चिता कॅम्प, सम्राट अशोक नगर, गोवंडी पूर्व, प्रबुद्ध नगर, स’ााद्री, भारत नगर, वाशी नाका, देवनार नगर या वसाहती आहेत. कत्तलखान आणि आरसीएफ, बीएआरसी या औद्योगीक कंपन्या याच मतदारसंघातल्या. लोकसंख्या १० लाखांच्या घरात असली तरी मतदार २ लाख ८२ हजार एवढे आहेत.
मध्यवर्गीय आणि विविधि भाषिक मतदार येथे पहायला मिळतात. परंतु भाषिक आणि जातीय मतांची गणिते या मतदारसंघात निर्णायक ठरतात. येथे ८५ हजार मुस्लिम, ५० हजार बौद्ध, ४० हजार उत्तर भारतीय आणि मराठी सहीत ७० हजार इतर मतदार आहेत.
विशेष म्हणजे चांगल्या शाळा नाहीत आणि एकही महाविद्यालय या मतदारसंघात नाही. डोंगराळ गावं असल्यामुळे पाण्याची समस्या अजूनही भेडसावत आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून दुर्घटना घडत असतात. एमएमआरडीएने लोकांचे पुनर्वसन करून बांधलेल्या इमारती या ठिकाणी आहेत. पण या वसाहतीतींची मोठी दुर्दशा झालेली आहे.
मुस्लिम-दलित मतांवर भिस्त
राष्ट्रवादीचे नवाब मलिक विद्यमान आमदार असून पुन्हा निवणुकीसाठी उभे आहेत. या मतदारसंघात एकूण सहा नगरसेवक असून शिवसेनेचे तीन, भाजप कॉग्रेंस आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मतदार मोठय़ा प्रमाणात येथे स्थिरावला आहे. शिवसेनेचे तुकाराम काते, कॉंग्रेसचे राजेंद्र महुलकर, भाजपचे विठ्ठल खरटमोल, शेकापचे अकबर हुसेन आणि मनसेच्या वीणा उकरंडे आदी या निवडणुकीत आहेत. तुकाराम काते मागील निवडणुकीत उभे होते. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता.
यंदा ते सर्व ताकदीनिशी उतरले आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांची मुस्लिम आणि दलित मतांवर भिस्त आहे.
भाजपाची पारंपारिक मते या मतदारसंघात तुलनेने कमी आहेत. कॉंग्रेसचे राजन महुलकर भुमिपुत्र असून त्यांची पत्नी नगरसेविका आहे. त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.
खोटी आश्वासन देत बसण्यापेक्षा कामे करण्यावर भर दिला आहे. गेल्या ५ वर्षांतील केलेली कामे ही जमेची बाजू आहे. जनसंपर्क सतत ठेवत आलो आहे. पाण्याची समस्या सोडवली, कोळी बांधवांसाठी जेट्टी बांधली. जी कामे नगरसेवकांनी करायची ती कामे त्यांनी न केल्याने मी आमदार असूनही पूर्ण करत गेलो. मतविभागणीची चिंता इतर पक्षांना आहे.
नवाब मलिक,
विद्यमान आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस
शिवसेनेचे जाळे या मतदारसंघात आहे. लोकांची कामे अविरतपणे करत होतो. दरडी कोसळू नये म्हणून संरक्षण भिंत बांधणे गरजेचे होते. ते काम मी करणार. महाराष्ट्र नगर येथे रेल्वे लाईन असून तेथे पादचारी पूल नसल्याने अपघात होत असतात. या कामांचा प्राधान्याने पाठपुरावा करणार. शिवसेनेला मानणारे मतदार आहेत. पण कामाच्या निमित्ताने इतर धर्मियांमध्येही चांगली प्रतिमा निर्माण केलेली आहे.
तुकाराम काते, शिवसेना.
उमेदवार
राष्ट्रवादी – नवाब मलिक, ल्ल शिक्षण – बी.ए (परीक्षा दिली नाही) * स्थावर – १ कोटी १० लाख ५ हजार ९८६ जंगम – ४१ लाख ३ हजार ६७६ रुपये,
शिवसेना – तुकाराम काते ल्ल शिक्षण – ९ वी नापास * स्थावर – ७३ लाख ४४ हजार २७५, जंगम – ६ लाख ९० हजार ३५४ रुपये,
भाजप – विठ्ठल खरटमोल ल्ल शिक्षण – दहावी, * स्थावर – १ कोटी ६० लाख जंगम – २६ लाख ८० हजार ८१६ रुपये
कॉंग्रेस – राजन महुलकर ल्ल शिक्षण – ९ वी पास, * मालमत्ता, स्थावर – १ कोटी ४७ लाख, जंगम – २५, ७७३, १४८ रुपये,
मनसे – वीणा उकरंडे ल्ल शिक्षण – १० वी * स्थावर – ८० लाख, जंगम – ४ लाख ७० हजार रुपये,
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
भूमिपुत्रांच्या दारात मूलभूत समस्यांचा पसारा
२५ टक्के डोंगराळ गावे व ११ गावठाणे असलेला हा मतदारसंघ. चिता कॅम्प, सम्राट अशोक नगर, गोवंडी पूर्व, प्रबुद्ध नगर, स'ााद्री, भारत नगर, वाशी नाका, देवनार नगर या वसाहती आहेत.
First published on: 14-10-2014 at 06:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter indicator anushakti nagar