लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचा ‘उमराव जान’ चित्रपट प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाली आहेत, परंतु अजूनही त्याची क्रेझ कायम आहे. मुझफ्फर अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा, गाणी आणि रेखाचे सादरीकरण प्रेक्षकांना भावले. सुरुवातीला स्मिता पाटीलला विचारण्यात आले होते, परंतु शेवटी रेखाने ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.