असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. हैद्राबाद मतदारसंघातून सलग पाचवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार विधानसभा मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn) मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही पक्षाचा विस्तार केला आहे. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच प्रतिनिधित्व करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीत ओवेसी वगळता त्यांचे इतर उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभेची जागा यावेळी त्यांना गमवावी लागली.


अनेक राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात. मुस्लीम समाजाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओवेसी करत आहेत. अल्पसंख्याकांची मते घेणाऱ्या काँग्रेस पक्षावर ओवेसी वेळोवेळी टीका करत असतात. काँग्रेस अल्पसंख्याकांची मते घेऊन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ते करतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर पक्ष करत असतात.


अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेत असताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. पॅलेस्टाईनबाबत केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे.


Read More
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींनी थेट पाकिस्तानच्या पंतप्रधान अन् लष्करप्रमुखांना डिवचलं; चीनचा उल्लेख करत म्हणाले…

रहीम यार खान एअरबेस १० मे पासून बंद करण्यात आले असून १८ मेपर्यंत बंद राहणार आहे. पाकिस्तान नागरी विमान वाहतूक…

Asaduddin Owaisi On India Pakistan ceasefire
Asaduddin Owaisi : “शस्त्रविराम होवो किंवा न होवो आपण, आपण पहलगाम…”, असदुद्दीन ओवेसींची पोस्ट चर्चेत; सरकारपुढे मांडले महत्त्वाचे प्रश्न

Asaduddin Owaisi On India Pakistan ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रविराम जाहीर झाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी केलेली सोशम मीडिया…

“वक्फ कायद्याबाबतच्या भूमिकेवर ठाम आहेच, पण दहशतवादाला पाठिंबा नाही” , एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी

केंद्राच्या वक्फ (सुधारणा) कायद्याविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व केल्यानंतर काही दिवसांतच पहलगाम येथे हल्ला झाला. तेव्हापासूनच ओवैसी पाकिस्तानवर…

Asaduddin Owaisi on pakistan
Asaduddin Owaisi: ‘पाकिस्तान भिकारी देश’, असदुद्दीन ओवेसींनी उडवली खिल्ली; म्हणाले, “त्यांनी इस्लामचा वापर…”

Asaduddin Owaisi: एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जहाल टीका केली असून आंतरराष्ट्री नाणेनिधीकडून त्यांनी मागितलेल्या अब्जावधींच्या कर्जावरून खिल्ली…

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : तुर्की प्रश्न कसे उपस्थित करू शकतो? भारताने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईच्या मुद्द्यावर ओवेसी स्पष्टच बोलले

असदुद्दीन ओवेसी यांनी दहशतवाद विरोधी कारवाईच्या मुद्द्यावर तुर्कीला खडे बोल सुनावले आहेत.

Assaduddin Owaisi operation sindoor
Asaduddin Owaisi : “जिहादच्या नावाखाली भारतात…”, सर्वपक्षीय बैठकीत असदुद्दीन ओवेसींनी मांडली भूमिका; चीन आणि तुर्कीचाही केला उल्लेख!

Asaduddin Owaisi on Operation Sindoor : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटून ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. यावेळी असदुद्दीन…

Asaduddin Owaisi on operation sindoor
Operation Sindoor : असदुद्दीन ओवेसी एअर स्ट्राईकबद्दल म्हणाले, “सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर…”

Asaduddin Owaisi on Operation Sindoor : असदुद्दीन ओवेसी यांनी एअर स्ट्राईकबद्दल बोलताना पहलगाम घटनेचा उल्लेख केला आहे.

Asaduddin Owaisi speaking at a public rally on India-Pakistan relations
Pakistan: “ते अपयशी राष्ट्र, भारताला शांततेत जगू देणार नाही”, असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला फटकारले

Pakistan Asaduddin Owaisi: ओवैसी यांनी केंद्र सरकारला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलण्याचा विचार करण्याचे आवाहन केले.

Asaduddin Owaisi statement on pok
Asaduddin Owaisi on PoK: “अब की बार घर मे घुसके…”, पाकव्याप्त काश्मीरबाबत असदुद्दीन ओवैसी यांचं मोठं विधान

Asaduddin Owaisi Message to Centre Govt: भाजपा सरकारने ठोस कृती करावी आणि यावेळी पाकव्याप्त काश्मीरवरच दावा करावा, असे आवाहन असदुद्दीन…

What Asaduddin Owaisi Said?
Asaduddin Owaisi : “बिलावल भुट्टोंच्या आईला ठार करणारे दहशतवादी, निष्पाप पर्यटकांना मारणारे चांगले का?” असदुद्दीन ओवैसींचा सवाल

AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे विधान केलं आहे.

Asaduddin Owaisis attack on Pakistan
Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल; म्हणाले…

Asaduddin Owaisi: AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी परभणी येथे पार पडलेल्या सभेत बोलताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला. “बरोबरी करु नका”,…

Asaduddin Owaisi Statement
Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल; “पाकिस्तानने सतत अणुबॉम्बच्या धमक्या देऊ नये, आम्ही…”

असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, पाकिस्तान आमच्यापेक्षा अर्धा युग मागे आहे हे त्यांनी विसरु नये असंही ओवैसींनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या