वांद्रे येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील साहाय्यक भविष्य निधी आयुक्त आणि भविष्य निधी अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असलेले रवींद्र वसंतराव शिंदे हे अलीकडेच सेवानिवृत्त झाले. शिंदे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि भविष्यनिधी आयुक्त-१ के. एल. गोयल यांनी उपस्थित राहून, त्यांचा सत्कार करीत निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
लिपिक म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रुजू झालेले रवींद्र शिंदे मोठय़ा मेहनत व जिद्दी साहाय्यक आयुक्त पदापर्यंत पोहोचले. तसेच सामाजिक कार्यात तसेच स्थानिय लोकाधिकार समितीच्या कार्यात त्यांनी सहभाग घेतला. यातून त्यांनी सहकाऱ्यांकडून प्रेम मिळविले आणि दांडगा लोकसंग्रहही निर्माण केला. १९८६ ते १९९० या दरम्यान ते भविष्य निधी कर्मचारी संघटना- महाराष्ट्र व गोवा विभागाचे सरचिटणीस म्हणून निवडणूक लढवून बहुमताने निवडून आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2015 12:54 pm