तवानच्या मशीन टूल्सच्या भारतातल्या आयातीत २०१५ च्या पहिल्या दोन तिमाहीत (जानेवारी ते जून) ११ टक्क्यांनी वाढ झाल्याने भारत आणि तवानमधले व्यापारीसंबंध वाढण्यास मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेला तवान-भारताच्या एकूण व्यापाराने २०१५ च्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये २१० कोटी डॉलरचा टप्पा गाठल्याची पाश्र्वभूमी लाभली आहे. तवानची भारतातली निर्यात १२८ कोटी डॉलर एवढी असून भारतातल्या वस्तूंची आयात ८२.८ कोटी डॉलपर्यंत पोहोचली आहे.
टाँगतायी मशीन अ‍ॅण्ड टूल कं.लि., शी हाँग इण्डस्ट्रिअल कं.लि., चाएन वेई प्रीसाइज टेक्नोलॉजी कं.लि., मेगा मशीन कं.लि. आणि फेअर फ्रेण्ड एण्टरप्राइज कं.लि. या पाच तवानी कंपन्यांनी भारतीय उत्पादनक्षेत्राला केंद्रस्थानी ठेऊन बनवलेली उत्पादने नुकतीच सादर केली.
भारतीय उत्पादन क्षेत्र आणि तवानच्या मशीन टूल क्षेत्रात असणारी सहकार्याची भावना यावरून स्पष्ट होते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मशीन टूल्स आणि त्याच्या इतर घटकांची निर्यात करणारा जगातला तिसरा मोठा देश म्हणून तवानकडे पाहिले जाते. तवानमध्ये वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांसाठी लागणारी मशीन टूल्स बनवली जातात.
‘भविष्यात अशी इच्छा आहे की तवानी उत्पादनांनी भारतातल्या उद्योगांच्या उत्पादनक्षमतेला अधिक वेग प्राप्त करून द्यावा’, असे मत भारतातल्या तपेई इकोनॉमिक अ‍ॅण्ड कल्चरल सेण्टरच्या इकोनॉमिक विभागाचे संचालक ली गुआन-जे यांनी व्यक्त केले.