मुंबई देशातील खासगी क्षेत्रातील स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्समध्ये ५४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जपानच्या दाय-इची लाइफने तिचा भांडवली हिस्सा अतिरिक्त १८ टक्क्य़ांनी वाढविला आहे. जीवन विमा व्यवसायातील ‘सुद लाइफ’ म्हणून परिचित ही कंपनी नऊ वर्षांपूर्वी दोन सरकारी बँका व जपानच्या दाय-इची लाइफ इन्शुरन्सने एकत्र येऊन स्थापित केली आहे.