scorecardresearch

LIC IPO: एलआयसीचे शेअर्स आज होणार अलॉट; ‘असा’ तपासा स्टेट्स

LIC IPO Allotment Status Today: तुम्हाला शेअर्स अलॉट झाले आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घ्या

Lic Ipo Allotment Status
(REUTERS/Illustration/File Photo)

Status of LIC IPO Allotment : तुम्ही एलआयसी आईपीओसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एलआयसीच्या शेअर्स आज अलॉट होणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला शेअर्स अलॉट झाले आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी प्रक्रिया संगत आहोत. एलआयसी आईपीओ बोली ४ ते ९ मे दरम्यान झाली. या आईपीओमध्ये, १० टक्के शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

एलआयसी आईपीओ २.९५ पट ओव्हरसबस्क्राइब झाला आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना अलॉटमेंटच्या वेळी चांगला नफा मिळणे अपेक्षित आहे. या आईपीओओमध्ये पात्र, किरकोळ, गैर-संस्थात्मक, कर्मचारी, पॉलिसीधारक यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या एपिसोडमध्ये, आज आम्ही तुम्हाला त्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही एलआयसी आईपीओच्या अलॉटमेंटचा स्टेट्स तपासू शकता.

कसा तपासायचा स्टेट्स ?

  • एलआयसी समभागांच्या अलॉटमेंटचा स्टेट्स तपासण्यासाठी, प्रथम तुम्हाला https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसायला लागतील. येथे तुम्हाला इक्विटी निवडावी लागेल. दुसरीकडे, दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला Debt चा पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करण्याची गरज नाही.
  • हे केल्यानंतर, इश्यूच्या नावात एलआयसी निवडा. हे केल्यानंतर, तुम्हाला IPO साठी अर्ज करताना मिळालेला अर्ज क्रमांक मिळाला आहे तो त्यात टाकायचा आहे.
  • अर्जाव्यतिरिक्त, तुम्ही शेअर अलॉटमेंट स्टेट्स तपासण्यासाठी तुमचा पॅन क्रमांक देखील वापरू शकता.
  • हे केल्यानंतर I am not robot हा पर्याय निवडून सबमिट करा.

या स्टेप्सला फॉलो करून, आपण आपला शेअर अलॉटमेंट स्टेट्स सहजपणे जाणून घेऊ शकता. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lic ipo allotment today here is how to check your status ttg

ताज्या बातम्या