11 August 2020

News Flash

भविष्याबाबत आशादायी चित्र!

१९९०मध्ये स्थापन झालेली सुप्रसिद्ध गोदरेज समूहाची ही स्थावर मालमत्ता विकास क्षेत्रातील कंपनी. आयएसओ प्रमाणन प्रमाणपत्र मिळवणारी ही या व्यवसायातील बहुधा पहिलीच कंपनी असावी.

| October 14, 2013 07:25 am

१९९०मध्ये स्थापन झालेली सुप्रसिद्ध गोदरेज समूहाची ही स्थावर मालमत्ता विकास क्षेत्रातील कंपनी. आयएसओ प्रमाणन प्रमाणपत्र मिळवणारी ही या व्यवसायातील बहुधा पहिलीच कंपनी असावी. भारतातील १२ प्रमुख शहरांतून निवासी, व्यावसायिक आणि गृह-वसाहती (टाऊनशिप) असे विविध प्रकल्प कंपनी राबवत असून सुमारे ८.५० कोटी चौरस फुटाचे विकसन करीत आहे. ३० जून २०१२ अखेर समाप्त तिमाहीसाठीचे कंपनीचे आर्थिक निष्कर्ष तितकेसे चांगले नसले तरीही कंपनीने नुकतीच सुमारे ७०० कोटी रुपयांची हक्कभागविक्री यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनी कर्जाचा भार हलका करू शकेल आणि पर्यायाने कंपनीचा व्याजाचा बोजाही कमी होईल. गोदरेज इंडस्ट्रीज या कंपनीची उपकंपनी असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीजने गेल्याच तिमाहीत गोदरेज इस्टेट डेव्हलपर्स या कंपनीचे ४९% भागभांडवल एचडीएफसीकडून खरेदी केले. त्यामुळे ही कंपनी आता गोदरेज प्रॉपर्टीजच्या संपूर्ण अधिपत्याखाली आली आहे. अहमदाबादमधील गोदरेज गार्डन सिटी हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या मार्गावर असून मुंबई येथील बांद्रा-कुर्ला संकुल, पनवेल, दिल्ली, गुरगाव आणि बंगळुरू येथे कंपनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. प्रति समभाग ३२५ रुपयांना हक्कभाग विक्री केल्यानंतर सध्या हा शेअर ३७५ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील परिस्थिती फारशी चांगली नसली तरीही उत्तम प्रवर्तक आणि गोदरेज समूहाचे पाठबळ, नवीन प्रकल्प तसेच पुढील आर्थिक वर्षांचे आशादायी चित्र यामुळे हा शेअर खरेदीयोग्य वाटतो.
(याच स्तंभातून दोनच आठवडय़ापूर्वी सुचविलेला टीव्हीएस मोटर्स ४८ रुपयांवर गेला आहे. आपले उद्दिष्ट साध्य झाले असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घ्यावा.)

शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ५१.००
परदेशी गुंतवणूकदार    १६.२
बँका / म्युच्युअल फंडस्    १९.५
सामान्यजन  व इतर    १३.३

गोदरेज प्रॉपर्टीज लि.
प्रवर्तक                                       :    गोदरेज समूह
सद्य बाजारभाव         रु.  ३७९.४५
प्रमुख व्यवसाय        स्थावर मालमत्ता
भरणा झालेले भाग भांडवल        रु. ९९.६२ कोटी
पुस्तकी मूल्य          रु.  २०७.२०
दर्शनी मूल्य          रु. १०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)        रु. ११.०३
किंमत उत्पन्न गुणोत्तर  (पी/ई)        ३५.१९ पट
बाजार भांडवल :  रु. ३,०५२ कोटी        बीटा : ०.४
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक   :    रु. ६१०/ रु. ३४०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2013 7:25 am

Web Title: hopefull picture of future
टॅग Arthvrutant
Next Stories
1 फसवणूक सत्राला मुदतवाढ!
2 गुंतवणूक निर्णय सुट्टीची योजना आखण्याइतपत बनवा रंजक!
3 जोखीम
Just Now!
X