News Flash

सर्वे सन्तु निरामया:

१ जुलै २०१३ पासून ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर २०१३’ अस्तित्वात आली. ३४८ जीवनावाश्यक औषधे या आदेशाने सरकारी नियंत्रणात येऊन नफेखोरीवर चाप लागला. नाममुद्रांकित औषधे ज्यांचा

| November 4, 2013 12:01 pm

१ जुलै २०१३ पासून ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर २०१३’ अस्तित्वात आली. ३४८ जीवनावाश्यक औषधे या आदेशाने सरकारी नियंत्रणात येऊन नफेखोरीवर चाप लागला. नाममुद्रांकित औषधे ज्यांचा एकूण बाजारपेठेत एक टक्क्याहून अधिक अशा औषधांच्या सरासरी किमतींच्या आधारावर या औषधांच्या किमती ठरविण्यात आल्या. मागील चार महिन्यांत औषधांच्या किमतीत मोठे फेरबदल झाले. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेल्या औषधांच्या किमती घटल्या तर स्थानिक कंपन्यांनी तयार केलेल्या औषधांच्या किमतीत वाढ झाली. ही वाढ आणि तिचा परिणाम लुपिन, इंडोको रेमेडीज, इप्का यांच्या मागील आठवडय़ात लागलेल्या निकालात दिसून आली. औषधांच्या किमतीची फेररचना झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात औषधांच्या संख्येत वाढ दिसून येणे अपेक्षित आहे. या आदेशाचे सिप्ला, डॉ. रेड्डी, ल्युपिन या त्रिमूर्तीव्यतिरिक्त इप्का, एफडीसी, जेबी, हायकल, युनिकेम, ऑरोिबदो फार्मा, कॅडीला हेल्थकेयर व इतर भारतीय औषध निर्माण कंपन्या लाभार्थी आहेत. म्हणूनच मागील सप्ताहापासून सुरू केलेल्या ‘आरोग्य पंचकातील’ उर्वरित भारतीय कंपन्यांतील दोन आजच्या भागात.
ल्ल  एफडीसी लिमिटेड
आपल्यापकी प्रत्येकाला कधी ना कधी अतिसाराने त्रस्त केले असेलच. कधी दूषित पाणी तर कधी दूषित अन्न.. कारण काहीही असले तरी व कोणताही उपाय केला तरी त्या उपायाच्या जोडीला डॉक्टर ‘इलेक्ट्रोल दर तासाला घ्या’ असा सल्ला देतात. ही कंपनी जरी अपरिचित असली तरी हे हिरव्या पांढऱ्या रंगाचे औषधाचे पाकीट दारिद्रय़ रेषेखालील ग्राहकापासून नवकोट नारायणापर्यंत याचा वापर करतात. आíथक स्तरानुसार त्यात बदल होत नाहीत. साधारण लहान मुल रांगायला लागले की घरभर फिरते व जमिनीवर पडलेले काही तरी तोंडात घालते. मग पोटदुखीने व अतिसाराने स्वत:ही जागते व आईलाही जागवते. सकाळी डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टर एखादे लहान मुलासाठीचे प्रतिजैवक व ‘इलेक्ट्रॉल’चा इलाज सुचवितात, अशा पद्धतीने वयाच्या सहा-सातव्या महिन्यांत आपली आणि आंबटगोड चवीच्या ‘इलेक्ट्रोल’ पावडरची  सोबत सुरूहोते. आजची कंपनी ‘इलेक्ट्रोल’ची निर्माती- फूड ड्रग अ‍ॅन्ड केमिकल्स लिमिटेड अर्थात ‘एफडीसी.’ ही कंपनी गेली ७० वष्रे औषध निर्मितीच्या व्यवसायात आपल्या उत्पादनांच्या जोरावर नाव व भरघोस नफा कमावून उभी आहे.
चंदावरकर कुटुंबीय प्रवर्तक असलेली ही कंपनी अतिसारावरच्या इलाजाबरोबरच अस्थमा, त्वचेचे विकार, हृदयरोग, मधुमेह, पचनाचे विकार, कॅल्शियम व लोह यांच्या भरपाई करणाऱ्या गोळ्या अ‍ॅण्टी एनेमिक, ओआरएस, प्रतिजैवके, अ‍ॅण्टी बॅक्टेरिअल अशा अनेक रोगांवर व इलाज असणारी औषधे, जीवनसत्त्व, खनिजपूरक अन्न तयार करते. कंपनीची ३०० हून अधिक उत्पादने औषध प्राधिकरणाकडे नदोंलेली आहेत. कंपनीचे स्फूर्तिदायक पेय ‘एनार्झाल’ हे मुंबई मॅरेथॉन-२०१२चे अधिकृत स्फूर्तिपेय होते. विविध खेळांच्या स्पर्धामधून कंपनी या पेयाची जाहिरात करत असते. कंपनीने एका स्थानिक फुटबॉल संघाबरोबर या पेयाच्या जाहिरातीसाठी करार केला आहे.  कंपनी ५० हून अधिक देशांत निर्यात करते. अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, जपान या बाजारपेठा विक्रीसाठी कठीण समजल्या जातात. या बाजारपेठांत ‘एफडीसी’ पाय रोवून घट्ट उभी आहे. तसेच युनिसेफ आंतरराष्ट्रीय औषध प्राधिकरण यांच्यासारख्या गरशासकीय संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या व्यवसायाचा एफडीसी एक घटक आहे. मागील वर्षी असलेली ९५.४१ कोटींची निर्यात ही चालू आíथक वर्षांत १०० कोटींचा आकडा पार करेल. वर उल्लेख केलेलं ‘इलेक्ट्रोल प्लेन’ – ज्याला तांत्रिक भाषेत ड१ं’ फीँ८१िं३्रल्ल रं’३२ असे म्हटले जाते – या उत्पादनाचे मागील पाच वर्षांत कंपनीची निर्यात वाढविण्यात सिंहाचा वाटा आहे. अत्यंत यशस्वी उत्पादने असलेली कंपनी म्हणून तिची ओळख त्याच्यापायीच आहे. औषधांची निर्यात करतानाच कंपनीने परदेशातील उत्पादकांबरोबर संशोधन व विकासासाठी सहकार्याचे करार केले आहेत. कंपनीचे जैवतंत्रज्ञान खाते असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहे. कंपनीचे कारखाने सिन्नर, वाळुंज (महाराष्ट्र), बड्डी (हिमाचल) व गोवा (दोन कारखाने) या ठिकाणी असून हे कारखाने डब्लूएचओ व युनिसेफ यांच्या पात्रतेप्रमाणे बांधले गेले आहेत. या जागतिक संस्थांकडून आवश्यक ती गुणवत्ता नियंत्रित केली जाते. वाळुंज येथील कारखाना यूएस एफडीए अर्थात अमेरिकेच्या अन्न व औषध प्राधिकरणाने प्रमाणित केला आहे. तर गोवा येथील करखाना यूके एमएचआरए अर्थात इंग्लंडच्या औषधे व आरोग्य सुविधा नियंत्रण प्राधिकरणाने प्रमाणित केला आहे.
भारतीय औषध निर्मिती बाजारपेठेत कंपनीचा वाटा १.१२% असून विक्रीनुसार कंपनी २५व्या क्रमांकावर आहे.
मागील वर्षी कंपनीचा नफा १९.३२ %ने वाढला आहे. कंपनीच्या ताळेबंदात भरपूर रोकडसदृश मालमत्ता दिसून येते. कंपनीने आíथक वर्ष २०१३ साठी २२५% लाभांश दिला आहे. कंपनीचा स्व-शेअर खरेदीचा (बायबॅक) कार्यक्रम सुरू असून प्रत्येकी जास्तीतजास्त ११० रुपयाने ६२.५ लाखांपर्यंत शेअर खरेदीस भागधारकांनी परवानगी दिली आहे. साधारण ३३ लाख शेअरची खरेदी पूर्ण झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. सध्याच्या ८२ रुपयाच्या भावावर आधारित २०१४चा पी/ई ८.८७ व २०१५चा पी/ई ७.६७ पाहता हा शेअर मुळीच महाग नाही. २०१४ची विक्री १२% व नफा १८%ने वाढणे अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात या शेअरच्या किमतीने शंभरी पार केलेली दिसेल बाजार सर्वकालीन शिखराच्या जवळ असताना सध्याच्या परिस्थितीत तरी १८-२०% नफा पदरात पडायच्या अपेक्षेने सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी करायला हरकत नाही.  
ल्ल  जेबी केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लि.
जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स ही १९७६ पासून अस्तित्वात असलेली एक औषध निर्माण व रसायन उद्योगातील नामांकित कंपनी आहे. महाराष्ट्र व गुजराथ राज्यात मिळून सात औषध निर्मिती कारखाने असून रशिया व दक्षिण आफ्रिकेत उपकंपन्या आहेत. कंपनीने आपला व्यवसाय तीन गटांत विभागाला आहे. पहिला गट जो ‘युनिक’ या नाममुद्रेने ओळखला जातो ज्यात हृदयरोग वेदना शमन औषधे व यकृताशी संबंधित विकारावर औषधे तयार होतात. दुसरा गट पचनसंस्था मूत्राशयाशी निगडित विकारांवर औषधे व पीडाशामक औषधे तयार होतात जो ‘जेबी’ नावाने ओळखला जातो. व तिसरा गट ज्यात दंत उपचार व प्रसूतीशी संबंधित औषधे तयार होतात. जेबी विविध उपचार गटापकी २२ गटांसाठी औषध निर्मिते करते. एकूण ३०० नाममुद्रांखाली औषधे विकणाऱ्या जेबीच्या नऊ नाममुद्रांचा समावेश पहिल्या १०० औषधी नाममुद्रांत होतो. मागील ३६ वर्षांपासून औषधनिर्मिती करणाऱ्या जेबीकडे अमेरिका, कोरिया, दुबई, युरोप, इंडोनेशिया आदी देशांच्या अन्न व औषध प्रशासनाची मान्यता त्या त्या देशात औषधविक्रीसाठी आहे. स्वत:ची औषधे विकण्याव्यतिरिक्त कंत्राटी तत्त्वावर औषध निर्मिती, परवाना पद्धतीने औषध निर्मिती, परदेशातील औषध निर्मितींच्या औषधांचे भारतात वितरण आदी क्षेत्रांत कंपनीने आपला ठसा उमटविला आहे. एकूण विक्रीपकी ५५% विक्री औषधांच्या निर्यातीतून येते. कंपनीचे ११ कारखाने असून त्यातील तीन कारखाने अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे प्रमाणित आहेत. अत्यल्प कर्ज असलेली व व्याज घसारा व करपूर्व २०% नफाक्षमता असलेली ही कंपनी ५० टक्के वार्षकि परताव्याच्या उद्देशाने घेण्यास हरकत नाही.

                                     एफडीसी                                            जेबी केमिकल्स
सद्यभाव (१ नोव्हें.)        ९१.००                                                  १००.४०    
वार्षकि उच्चांक                 १०५.९५                                               १०४.५०
वार्षकि निच्चांक                ७९.००                                                  ६९.०५    
दर्शनी मूल्य                           १                                                        २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 12:01 pm

Web Title: investment guidance hdfc and jb chemicals
टॅग : Business News
Next Stories
1 गुंतवणूक फराळ
2 रंग-उधळण!
3 रेपोदर वाढीची शक्यता कमीच
Just Now!
X