भारतात मनोरंजन म्हटले की आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचा पहिला संदर्भ येतो. टेलिव्हिजन हे दृकश्राव्य माध्यम असल्या कारणाने त्याची ताकद जास्तच आहे हे आपण समजून आहोत. १९८० च्या दशकात छायागीत, चित्रहार, साप्ताहिकी, मराठी व िहदी चित्रपट पाहण्यासाठी घरोघरी लोकांची गर्दी जमत असे. १९८२ साली रंगीत टीव्हीचे आगमन भारतात ‘नेहरू कप’मुळे झाले. त्यामुळे दूरदर्शनतर्फे प्रसारण होणाऱ्या मनोरंजन कार्यक्रमाचा दर्जा वाढू लागला व आपोआप प्रेक्षक संख्याही वाढू लागली. हम लोग (१९८४), ये जो है जिंदगी (१९८४-८५), बुनियाद (१९८६-८७), रामायण (१९८७-८८), महाभारत (१९८९-९०) या कार्यक्रम प्रसारण वेळांदरम्यान रस्त्यांवर शुकशुकाट असायचा. अशा मनोरंजन व करमणुकीच्या कार्यक्रमांमुळे सगळ्यात जास्त फायदा जाहिरात क्षेत्रास झाला.
१९९१ साली ‘आíथक उदारीकरणा’अंतर्गत भारतीय प्रसार माध्यम क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले झाले, त्यामुळे १९९४-९५ दरम्यान झी टीव्ही, सन टीव्ही, ई टीव्ही या भारतीय कंपन्यांनी, तर स्टार टीव्ही, सी एन एन, एमटीव्ही परदेशी कंपन्यांच्या वाहिन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. या वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) व त्यांचे टीआरपी रेटिंग्स यांचे महत्त्व वाढू लागले आणि किती प्रेक्षकवर्ग कोणता मनोरंजन कार्यक्रम कोणत्या टीव्ही वाहिनीवर बघतात याचे ढोबळ आकडे मिळायला लागले. भारतीय प्रसारमाध्यम क्षेत्राने माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने १९९४ ते २०१० या वर्षांत बरीच प्रगती केली आणि त्यामुळे टीव्हीव्यतिरिक्त रेडिओ, छपाई, चित्रपट, संगीत, डिजिटल जाहिरात, गेिमग, ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अ‍ॅनिमेशन, डिजिटल जाहिरात या क्षेत्रांचा विकास होत गेला. नोव्हेंबर २०११ दरम्यान माहिती व प्रसारण मंत्रालयाने भारतीय केबल टेलिव्हिजन नेटवर्क (जाळे) हे २०१५ पर्यंत संपूर्णपणे ‘डिजिटल’ करण्यात येईल, असा सरकारी फतवा काढला. या ‘डिजिटाइझेशन’मुळे कोणत्याही स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रांचा आणि आवाजाचा स्तर व गुणवत्ता कितीतरी अधिक प्रमाणात चांगली आहे किंवा असते हे सिद्ध झाले आहे आणि आपोआपच वरील नमूद केलेल्या क्षेत्रात संबंधित प्रेक्षक व ग्राहकवर्ग वाढतील, असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. उद्योग संघटना ‘फिक्की’च्या २०१३ च्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतीय मनोरंजन व प्रसारमाध्यम या उद्योगक्षेत्राची व्यावसायिक उलाढाल २०१७ पर्यंत रुपये एक लाख कोटींपेक्षा जास्त होईल आणि हाच अभ्यास लक्षात घेऊन रिलायन्स म्युच्युअल फंडाने भारतीय मनोरंजन व प्रसारमाध्यमांशी संबंधित फंड गुंतवणुकीसाठी सुरू केला आहे.
रिलायन्स मीडिया एंटरटेन्मेंट फंड हा एक सेक्टोरल फंड असून, केवळ भारतीय मनोरंजन व प्रसार माध्यम या उद्योगक्षेत्राशी संबंधित असून, कायम गुंतवणुकीसाठी खुला असणारा (ओपन एंडेड) फंड आहे. हा फंड २७ सप्टेंबर २००४ रोजी प्रथम गुंतवणुकीस खुला झाला. या फंडाचे उद्दिष्ट भारतीय मनोरंजन व प्रसारमाध्यमांशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवली नफा मिळविणे हे आहे.
शैलेश राज भान हे या फंडाचे गुंतवणूक व्यवस्थापक आहेत. यात ग्रोथ व लाभांश असे दोन गुंतवणूक पर्याय यात आहेत.
१२ जुल २०१३ रोजी या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रु ३४.७१ होते व फंड निधी (गंगाजळी) रु. १०२.६५ कोटी होता.       
गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत फंडातून बाहेर पडल्यास निर्गमन १% शुल्क आकारले जाते. किमान रु. ५,००० भरून या योजनेत गुंतवणुकीस सुरुवात करता येते. नंतर रु. १००० किंवा रु. १००० च्या पटीत या योजनेची युनिट्स विकत घेता येतात. गुंतवणूक योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी एनएसई मीडिया हा निर्देशांक मानदंड म्हणून वापरण्यात येतो. पुढील पाच वर्षांसाठी छोटय़ा स्वरूपात, परंतु नियमित गुंतवणूक या फंडात ‘एसआयपी’द्वारे करण्यास हरकत नाही.      
सोबतच्या कोष्टकात या फंडाच्या परताव्यासंबंधी माहिती दिली आहे.

कालावधी            परतावा %
१ महिने     -२.००
३ महिने     -१.००   
६ महिने    -१३.१२   
१ वर्ष         २१.५०
२ वष्रे    १४.३०
३ वष्रे    ६.९०
५ वष्रे    ८.००