Gurru Vakri 2025 In Mithun : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू हा ज्ञान, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थाने, संपत्ती, दान, पुण्य व वृद्धीचा कारक मानला जातो. जेव्हा गुरू कोणत्या राशीत वक्री होतो किंवा नक्षत्रबदल करतो तेव्हा त्याचा सर्व क्षेत्रांवर विशेष प्रभाव दिसून येतो. त्यात वर्षाच्या अखेरीस गुरू मिथुन राशीत वक्री होणार आहे. मिथुन राशीवर बुध ग्रहाचे अधिपत्य आहे, ज्यामुळे गुरू ग्रहाच्या वक्री होण्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. म्हणजेच गुरूच्या आशीर्वादाने या राशींच्या संपत्तीत वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. पण, नेमक्या कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…
तूळ
गुरू वक्री होणे तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि पदोन्नती मिळू शकते. सामाजिक पातळीवर तुमच्या नावाचा गवगवा होईल. या काळात स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.
सिंह
गुरू वक्री होणे सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या ज्ञानामुळे चांगले नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला तुमच्या कमाईतून चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल.
कन्या
गुरूची वक्री चाल कन्या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती साधता येऊ शकते. बेरोजगारांना नोकरीच्या अनेक संधी चालून येतील, तसेच नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यावसायिकांनाही त्यांच्या व्यवसायातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.