Mangal Gochar 2025 Singh Rashi impact In Marathi: ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, आज ७ जून २०२५ रोजी, पहाटे ०२:२८ वाजता, मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. मंगळाचे हे संक्रमण अनेक राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा साहस, पराक्रम व मांगल्याचा ग्रह सुद्धा मानला गेला आहे. त्यामुळे मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशींना शुभ फळ देणार आहे. या कालावधीत नेमक्या कोणत्या नशीबवान राशींना लाभ होऊ शकतो हे पाहूया…
मंगळदेवाच्या कृपेने आजपासून ‘या’ चार राशींचे अच्छे दिन?
१. मिथुन (Gemini)
मंगळाचे राशीबदल मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांचा प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पैशाची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरु शकते. या काळात कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मानात भर पडू शकते.
२. सिंह (Leo)
मंगळाचे राशीबदल सिंह राशींच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येणारे ठरु शकते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेली एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. प्रमोशन व पगारवाढ दोन्हीची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
३. तूळ (Libra)
मंगळाचे राशीबदल तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. व्यवसायात नवे सौदे मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो. घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)