Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पाहायला मिळतो शिवाय काही ग्रहांची राशी परिवर्तनामुळे युतीदेखील निर्माण होते. पंचांगानुसार मंगळ, केतू सिंह राशीत युती निर्माण करणार असून मीन राशीतील शनीबरोबर मंगळ षडाष्टक योग निर्माण करणार आहे. तसेच मंगळ-केतूची युती कुजकेतु योगदेखील निर्माण करत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचे नशीब चमकण्यास मदत होईल.
‘या’ तीन राशींना मिळणार नशीबाची साथ
वृषभ (Vrushabh Rashi)
कुजकेतु आणि षडाष्टक योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नव्या नोकरीची संधी मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल. वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळेल. प्रवास घडतील आणि आरोग्यही चांगले राहील. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.
मकर (Makar Rashi)
कुजकेतु आणि षडाष्टक योग मकर राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होतील. धार्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नवीन छंद आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. या काळात घरामध्ये शुभकार्ये पार पडतील.
मिथुन (Mithun Rashi)
कुजकेतु आणि षडाष्टक योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येतील. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन गाडी, मोबाईल विकत घेऊ शकता. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)