Mangal Ketu Yuti create Angarak Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतो, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. जुलैच्या २८ दिवसांसाठी अंगारक योग निर्माण होत आहे.
सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतुच्या या धोकादायक युतीपासून अंगारक योग निर्माण होत आहे. सूर्याच्या सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतु एकत्र २८ तारखेपर्यंत विराजमान राहणार. ज्योतिषशास्त्रानुसार, अशात काही राशींच्या अडचणी वाढू शकतात. तसेच काही राशींना धनहानी होऊ शकते तसेच आरोग्य बिघडू शकते. काही अपघाताचे योग सुद्धा निर्माण होत आहे. अशात या राशींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. त्या राशी कोणत्या याविषयी जाणून घेणार आहोत.
सिंह राशी(Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी अंगारक योग हानिकारक ठरू शकतो. कारण हा योग या राशीच्या लग्न भावात निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात यांचा स्वभाव रागीट होऊ शकतो. अशात राग येऊ नये, याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. तसेच या दरम्यान जोडीदाराबरोबर तणाव होऊ शकतो. तसेच तुम्ही या दरम्यान पार्टनरशिपमध्ये कोणतेही काम सुरू करत असाल, तर थांबा. नवीन गुंतवणूक करणे टाळा.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, अंगारक योग या राशीसाठी उत्तम नाही. कारण हा योग या राशीच्या कर्म भावात निर्माण होत आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांबरोबर कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. संयमाने काम करावे. नाहीतर वादामुळे या लोकांच्या प्रतिमेला धक्का पोहचू शकतो. तसेच या दरम्यान नोकरी करणाऱ्या लोकांनी नोकरी बदलू नये. या दरम्यान अपघाताचे योग आहे. त्यामुळे वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. ज्या महिला गर्भवती आहे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मकर राशी (Makar Zodiac)
ज्योतिषशास्त्राच्या मते, या लोकांसाठी अंगारक योग नुकसानदायक ठरू शकते कारण हा योग गोचर कुंडलीच्या अष्टम भावात निर्माण होत आहे. त्यामुळे कोणताही जुना आजार पुन्हा होऊ शकतो. या दरम्यान या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या लोकांना कोणत्याही गोष्टीवरून तणाव येऊ शकतो. जोडीदाराबरोबर नाराजी दिसून येईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)