13 July 2020

News Flash

नांदेड ४.०५ तर औरंगाबाद ८.०६ अंशावर

थंडी वाढल्यामुळे विषाणुजन्य आजाराच्या प्रमाणात वाढ

मागील चार दिवसांपासून शहरात थंडी वाढली असून, आज पारा ८.०६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. चार दिवसांपूर्वी काढण्यात आलेले गरम कपडे दिवसभर अंगावर ठेवण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली. काल शुक्रवारी ९ अंशावर असणारा पारा आज पुन्हा घसरला.
थंडी वाढल्यामुळे विषाणुजन्य आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. घसा खवखवणे व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हुडहुडी भरविणारी थंडी असणाऱ्यांना पहाटे फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. वृद्ध आणि लहान मुलांना थंडीपासून वाचविण्यासाठी हे मुख्य काम होऊन बसले. आणखी काही दिवस अशाच पद्धतीचे तापमान असेल, असे वेधशाळेतून सांगण्यात आले. नांदेड जिल्हय़ातील पारा घसरलेलाच होता. आज सकाळी नांदेडचे तापमान ४.०५ अंश एवढे नोंदविले गेले. उस्मानाबाद जिल्हय़ातील किमान तापमानाची नोंद ८.०६ एवढीच होती. संपूर्ण मराठवाडाच गारठला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 3:30 am

Web Title: 4 05 in nanded and 8 06 degrees in aurangabad
टॅग Aurangabad,Nanded
Next Stories
1 गुलमंडीसाठी तनवाणींना भाजपाचे पाठबळ
2 राज्यात दीड लाख कोटींचे रस्ते उभारणार
3 दोन वाहनांच्या अपघातात पंधरा जण जखमी
Just Now!
X