औरंगाबादमध्ये अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याची आत्महत्या

गणेशने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून गणेशचे वडील पोलीस कर्मचारी आहेत.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

औरंगाबादमध्ये १८ वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून गणेश नायके असे या तरुणाचे नाव आहे. महिनाभरावर परीक्षा आली असताना त्याने आत्महत्या केली असून परीक्षेच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.

औरंगाबादेत सिडको एन-२ येथील तोरणागड नगरमध्ये गणेश नायके हा तरुण राहतो. गणेशने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून गणेशचे वडील पोलीस कर्मचारी आहेत. गणेश हा अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी आहे. परीक्षेच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये गेल्या तीन दिवसात आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. बुधवारी वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. विकास मछिद्र पवारला असे या विद्यार्थ्याचे नाव होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Engineering student commits suicide in cidco

ताज्या बातम्या