छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक कॉलेजसमोर गुरुवारी पहाटे एचपी गॅसचा टँकर उलटून गॅस गळती होत असल्याची घटना घडली. घटनास्थळी सहा पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचेही टँकर दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू आहे. या परिसरात कोणीही जाऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे. संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली असून, चार तासांसाठी तीन उपकेंद्रांवरील वीजही बंद करण्यात आली आहे. वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : फुटीनंतरही उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिलेल्या परभणीत भगवा पुन्हा फडकणार ? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रांती चौकाकडून जालना रोडने जालन्याच्या दिशेने जाणारा भरधाव गॅसचा टँकर सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डान पुलावर चढताना दुभाजकाला धडकला. या घटनेची माहिती माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांनी व एका हॉटेलच्या व्यवस्थापकाने संपर्क करून कळवली, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.