Aadhaar Card Online Update Process : आधार कार्ड प्रत्येकासाठी एक महत्वाचं कागदपत्र आहे ; असे म्हणायला हरकत नाही. कारण – फिरायला जाण्यासाठी एखादा व्हिला बूक करताना ते अगदी नोकरीवर रुजू होतानाही आधार कार्ड मागितले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक १० वर्षात आपलं आधार कार्ड अपडेट करण्यास आवर्जून सांगितले आहे. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला आधार कार्डवरील नाव, पत्ता बदलावा लागतो. मग यासाठी वेळ काढून नोंदणी केंद्रात भेट देण्यावजी घरबसल्या सुद्धा तुम्ही आधार कार्डबद्दलची माहिती उपडेट करू शकता.
म्हणजेच जर तुमच्या आधार कार्डच्या माहितीमध्ये किंवा आधार कार्ड संबंधित अर्ज सादर केल्यानंतरची माहिती बदलायची असेल तर तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) वेबसाइटला भेट द्या आणि हवी ती माहिती ऑनलाइन अपडेट करा. तुम्ही आधार कार्डवरील लोकसंख्याशास्त्रीय असो किंवा बायोमेट्रिक माहिती दोन्ही अपडेट करू शकता…
जर तुमचे लोकसंख्याशास्त्रीय तपशील (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर) तुमच्या आधार रेकॉर्डशी जुळत असतील तरच तुम्ही तुमचे आधार दस्तऐवज अपडेट करू शकता. जर आधार कार्ड आणि तुमच्या ओळखीचा किंवा पत्त्याचा पुरावा जुळत नसेल, तर सहाय्यक कागदपत्रे अपडेट करण्यापूर्वी प्रथम तुमचे आधार तपशील अपडेट करा.
तर आधार कार्डची कोणती माहिती अपडेट करता येते? (What Details Can be Updated in Aadhaar Card )
१. वैयक्तिक माहिती
- नाव तुम्ही दोनदा बदलू शकता (लग्नानंतर किंवा आवडीनुसार).
- जन्मतारीख एकदाच बदलण्याची परवानगी दिली जाते.
- लिंग एकदाच बदलण्याची परवानगी असते.
- पत्ता बऱ्याच वेळा अपडेट करता येतो.
२. संपर्क
- मोबाइल नंबर अनेकदा अपडेट करता येतो.
- तर ईमेल आयडी सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता.
३. बायोमेट्रिक आणि फोटो अपडेट
- फोटो
- फिंगरप्रिंट
- आयरिस
आधार कार्डची माहिती ऑनलाइन कशी अपडेट करावी (How To Update Aadhaar Card Online)
नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख ऑनलाइन अपडेट करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे…
- अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्या.
- तुमचा आधार क्रमांक आणि OTP वापरून पोर्टलवर लॉग इन करा.
- ‘My Aadhaar’ टॅब अंतर्गत ‘Update Address in your Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
- ‘Update Demographics Data and Check Status’ पर्यायावर क्लिक करा.
- नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि कॅप्चा कोड टाइप करा.
- ओटीपी पाठवावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा; जो आधार अपडेट पोर्टलवर पुनर्निर्देशित केला जाईल.
- (नाव, पत्ता, जन्मतारीख) पैकी तुम्हाला जे बदलायचे असेल त्या पर्यायावर क्लिक करा. उदाहरणार्थ – ‘Address Update’ पर्यायावर क्लिक करा.
- ‘Update Aadhaar Online’ पर्यायावर क्लिक करा.
- सूचनांचे पालन केल्यानंतर ‘Proceed to Update Aadhaar ‘ बटणावर क्लिक करा.
- “पत्ता” हा पर्याय निवडा
- आधार अपडेट करण्यासाठी पुढे जावर क्लिक करा.
- माहिती तपासा आणि ‘Next’ वर क्लिक करा.
- त्यानंतर ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
१. एसआरएन तयार होईल जो आधार अपडेट स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
२. आधारवरील तपशील अपडेट करण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
३. अर्ज मंजूर झाल्यानंतर अपडेट केलेले आधार तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाईल.
४. अर्ज मजूर न केल्यास व्यक्तींना पुन्हा अर्ज करावा लागतो.
आधार कार्ड उपडेट झाल्यावर ऑनलाईन कसे तपासायचे ? (How To Check Aadhaar Card Online)
- अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्या
- क्रेडेन्शियल्स वापरून पोर्टलवर लॉग इन करा
- ‘My Aadhaa’ सेक्शन अंतर्गत ‘Check Aadhaar Status’ वर क्लिक करा
- नोंदणी क्रमांक आणि नोंदणीची वेळ प्रविष्ट करा
- कॅप्चा पडताळणी कोड प्रविष्ट केल्यानंतर ‘Check Status’ वर क्लिक करा.
आधार अपडेट करताना काय लक्षात ठेवाल? (Things to Remember when Updating the Aadhaar Card)
ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना…
- फॉर्म मोठ्या अक्षरात भरा
- नावापूर्वी श्री, श्रीमती किंवा मिस असे लिहू नका
- फॉर्म व्यक्तीच्या मूळ भाषेत किंवा इंग्रजीमध्ये भरा
- सध्याचा मोबाईल नंबर द्या
- आधार कुठे पाठवायचा तो योग्य पत्ता द्या
- अर्जाबरोबर, व्यक्तींनी त्यांचे आवश्यक कागदपत्रे देखील जोडावीत
- जर कोणतेही कालबाह्य झालेले कागदपत्रे सादर केली तर अर्ज नाकारला जाईल
- अचूक माहिती दिली आहे का याची खात्री करावी
तर अशाप्रकारे तुम्ही तुमची माहिती ऑनलाईन अपडेट करू शकता…