scorecardresearch

पेटीएमला RBIकडून मोठा दिलासा, पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी मिळाला अधिक वेळ

पेमेंट एग्रीगेटर एक सेवा पुरवठादार आहे, जो एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारची पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. मिळालेल्या माहितीनुसार, PPSL ला 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

Paytm launch upi lite service
Paytm- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमला आरबीआयकडून मोठा दिलासा मिळाला आहे. RBIने पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (PPSL)ला पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज करण्यास अतिरिक्त वेळ दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने PPSL साठी पेमेंट एग्रीगेटर सादर करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे, ज्याची माहिती PPSLची मूळ कंपनी One97 Communicationsने नियामक फायलिंगमध्ये दिली आहे. पेमेंट एग्रीगेटर एक सेवा पुरवठादार आहे, जी एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारची पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. मिळालेल्या माहितीनुसार, PPSL ला 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

१५ दिवसांचा वेळ मिळाला

दरम्यान, PPSL पेमेंट एग्रीगेटर म्हणून तिचे कार्य सुरू ठेवू शकते ही माहिती पेटीएमनेच एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी PPSL कडे १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ आहे. त्यानंतर आता PPSL आपल्या परवान्यासाठी आरामात अर्ज करू शकेल, असंही वन ९७ कम्युनिकेशन्सने सांगितले.

उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही

या प्रक्रियेदरम्यान PPSL कोणत्याही नवीन व्यापाऱ्यांना ऑनबोर्ड न करता त्याच्या भागीदारांसाठी ऑनलाइन पेमेंट व्यवसाय सुरू ठेवू शकते. तसेच RBI च्या या निर्णयाचा PPSL च्या व्यवसायावर आणि महसुलावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. RBI चे हे अपडेट फक्त नवीन ऑनलाइन व्यापाऱ्यांच्या ऑनबोर्डिंगसाठी आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. दरम्यान, PPSL त्याच्या विद्यमान ऑनलाइन व्यापाऱ्यांना पेमेंट सेवा प्रदान करणे सुरू ठेवू शकते. तसेच ऑफलाइन व्यवसायासाठी One97 कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम आपल्या नवीन व्यापार्‍यांना ऑनबोर्ड करू शकते आणि त्यांना ऑल-इन-वन क्यूआर, साउंडबॉक्स, कार्ड मशीन यांसारख्या पेमेंट सेवा देऊ शकते.

पेमेंट एग्रीगेटर परवाना का आवश्यक?

पेमेंट एग्रीगेटर ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट घेतो आणि निर्धारित वेळेत ते दुकानदार आणि ई-कॉमर्स साइटवर हस्तांतरित करतो. आतापर्यंत १८५ पेक्षा जास्त फिनटेक कंपन्या आणि स्टार्टअप्सनी पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज केले आहेत. याद्वारे ऑनलाइन व्यवहार सहज होणार असल्याने ते अनिवार्य करणेही आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 18:32 IST

संबंधित बातम्या