श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ या विषयावर चर्चा करणार आहोत. मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न व या प्रश्नांची उकल करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

*   विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि तिच्या  यशाची चर्चा करा.

*   ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा.

*   कोणत्या परिस्थितीमुळे १९६६ चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ाची चर्चा करा.

*   कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या मुद्दय़ामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा.

*   लेनिनच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाने भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा.

*   भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला दृढता मिळालेली आहे का?

*   स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती (STs) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले?

*   २०१८ आणि २०१९ मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही.

*   उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडमोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

*   वरील प्रश्नामध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न हे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करून नेमकी त्याची तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये याची नेमकी उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले अशा महत्त्वाच्या पैलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित होते.

*   भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जो नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते त्यावर लेनिनच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाचा प्रभाव कसा होता, हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.

*   उपरोक्त प्रश्नामधील ‘भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का? हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांतरचना का करण्यात आलेली होती तसेच याची नेमकी कारणे कोणती होती व याचा नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या. तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उद्दिष्टे यांसारख्या पैलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.

*   उपरोक्त प्रश्नामधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धांच्या पार्श्वभूमीला ग्राह्य़ धरून विचारण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानाचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी याचीही माहिती असणे गरजेचे आहे व तात्कालिक नेमकी कोणती कारणे होती इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत. तसेच

ताश्कंद कराराची वैशिष्टय़े नेमकी काय होती याची संकीर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. थोडक्यात, हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.

*    या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप आणि याची उत्तरे नेमकी कशी लिहावी याची एक योग्य दिशा मिळते. याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते.

या घटकाचे परीक्षाभिमुख आकलन खालील पद्धतीने करणे उपयुक्त ठरू शकते.

या विषयाची तयारी करताना भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड—बांगलादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी. पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यांतील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकांशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते. या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत, म्हणजे येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.

या घटकाची तयारी करताना आधी एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता १२ वीचे राज्यशास्त्राचे ‘पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स  इंडिपेन्डन्स’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर  इंडीपेन्डन्स’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात.