BCAS Recruitment 2024: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) अंतर्गत १०८ पदांच्या विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. BCAS भरती २०२४ साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचा बायोडाटा अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. याबरोबरचं काही कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. भरतीसाठी आवश्यक वयोमर्यदा, शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे, पदसंख्या, अर्ज कसा सादर करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
रिक्त पदे आणि पदसंख्या –
उपसंचालक – ०६ पदे, सहसंचालक / प्रादेशिक संचालक – ०९ पदे, सहाय्यक संचालक – ४६ पदे व वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी – ४७ म्हणजेच एकूण १०८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यदा –
उपसंचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षे असावे.
सहसंचालक / प्रादेशिक संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षे असावे.
सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५२ वर्षे असावे.
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकाऱ्याचे वय ५६ वर्षे असावे.
अर्ज कसा सादर करावा ?
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांना रोजगाराच्या बातम्यांमध्ये भरतीची अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत त्यांचा अर्ज सादर करावा लागेल.
अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट देखील तपासून पाहू शकता…
लिंक – rectt.bsf.gov.in
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व अर्ज पाठवण्याचा पत्ता अधिसूचनेत एकदा तपासून घ्यावी…
लिंक – https://bcasindia.gov.in/buisness/vc2024/FillingupofvariousgroupAandBinBCASondeputationreg_0001.pdf
तर अशाप्रकारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत .