BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2023: बृहन्मुंबई महापालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘स्वच्छता निरिक्षक’ पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२३ आहे. BMC लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालय भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – स्वच्छता निरिक्षक

एकूण पदसंख्या – १०

शैक्षणिक पात्रता –

  • उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा.

नोकरी ठिकाण – मुंबई</strong>

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टि.म.स. रुग्णालयाच्या आवक / जावक विभागात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.ltmgh.com

पगार – भरती अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांना महिना २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1rm6fp1pTkZWese0DVKQ-GBYkMtxb9m2E/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.