Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध विभागांतील रिक्त असलेल्या १११ पदांसाठी भरती राबवली जात आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १५ जानेवारीपर्यंत तब्बल चार हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जर तुम्ही या पदासाठी अजुनही अर्ज भरला नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण आता ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज मुदत तारखेच्या आधी पाठवावा लागेल. ऑफलाईन अर्ज करण्यात १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

बऱ्याच वर्षात प्राध्यापक भरती झालेली नव्हती त्यामुळे अनेक जागा रिक्त होत्या त्यामुळे आता तब्बल १११ पदांसाठी भरती प्रकिया राबवली जात आहे त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक चांगली संघी आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि हा अर्ज कसा भरावा, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव-
१. प्राध्यापक
२. सहयोगी प्राध्यापक
३. सहायक प्राध्यापक

पदसंख्या – १११
१. प्राध्यापक – ३२
२. सहयोगी प्राध्यापक – ३२
३. सहायक प्राध्यापक – ३२

शैक्षणिक पात्रता
१. प्राध्यापक – पीएचडी
२. सहयोगी प्राध्यापक – पीएचडी
३. सहायक प्राध्यापक – पीएचडी

हेही वाचा : १० वी पास तरुणांसाठी मुंबई कस्टम्समध्ये नोकरीची संधी; अर्जाची मुदत, पगार, पात्रता सगळं एका क्लिकवर पाहा

नोकरी ठिकाण पुणे</p>

अर्ज पद्धती – ऑनलाईन किंवा ऑफलाईन

वेतन –
१. प्राध्यापक – १,४४,२००
२. सहयोगी प्राध्यापक – १,३१,४००
३. सहायक प्राध्यापक – ५७,७००

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज कसा भरावा?

या सर्व पदांसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरू शकता.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन नीट वाचावे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे तर अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे.
अर्जाची हार्ड कॉपी खालील पत्त्यावर जमा करा. -सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007
https://shorturl.at/pzR19 या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://shorturl.at/nHNQW या लिंकवर क्लिक करावे.