RBI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालवता भरतीसाठी अर्ज करावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयने अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ९४ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे. परीक्षेचा पहिला आणि दुसरा टप्पा सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, रिक्त पदे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

RBI Recruitment 2024 : रिक्त पद –
या भरती अंतर्गत अधिकारी (ऑफिसर) पदांच्या ९४ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

RRB Technician Recruitment 2024
RRB Technician Recruitment 2024: रेल्वेमध्ये होणार १४,२९८ पदांसाठी भरती, कसा करावा अर्ज?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
SBI SCO recruitment 2024:
SBI SCO Recruitment 2024: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजरच्या १४९७ पदांसाठी होणार भरती! आजच करा अर्ज
Google Trending Personal Loans in Marathi
Personal Loans : भारतात पर्सनल लोनच्या मागणीत प्रचंड वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज? वाचा सविस्तर
Canara Bank Apprentice Recruitment 2024
कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल तीन हजार जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Sbi recruitment 2024 notification in marathi
SBI Recruitment 2024 : स्टेट बँकेत १५०० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती, पगार ९३ हजार; पण ‘हेच’ उमेदवार करु शकतात अर्ज
Iphone 16 Series Price In India Apple unveils iPhone 16 and iPhone 16 Plus, price starts from Rs 79,900 and Rs 89,900 respectively
iPhone 16 Price: प्रतीक्षा संपली! भारतात आयफोन 16 आणि 16 Plus ची किंमत किती? जाणून घ्या फीचर्ससह सर्वकाही
Growth at reasonable price is the investment formula of Baroda BNP Paribas Large and Midcap Fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र : बडोदा बीएनपी पारिबा लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड

RBI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि ६० टक्के गुण तर (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी अर्जदारांसाठी ५० टक्के) तर (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी अर्जदारांसाठी \ ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण) असणे आवश्यक आहे.

RBI Recruitment 2024 : अर्ज फी –

अर्ज फी एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी १०० रुपये प्लस १८ टक्के जीएसटी तर ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ८५० रुपये प्लस १८ टक्के जीएसटी आहे. उमेदवार डेबिट कार्ड, रूपे, व्हिसा, मास्टर कार्ड, Maestro, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड्स, मोबाइल वॉलेट्स, यूपीआय वापरून पेमेंट करू शकतात.

हेही वाचा…SBI Recruitment For Sportspersons: बँकेत खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ६४ हजार रुपयांपर्यंत पगार; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

RBI Recruitment 2024 : निवड प्रक्रिया –

१. निवड प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि मुलाखत यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत २०० गुणांसाठी एकच पेपर असेल आणि ती ८ सप्टेंबर २०२४ रोजी घेतली जाईल. उमेदवारांच्या संख्येनुसार, परीक्षा अनेक शिफ्टमध्ये आणि काही इतर दिवशीही घेतली जाऊ शकते.

२. दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा १९ ऑक्टोबर २०२४ रोजी फक्त पहिल्या टप्याच्या निकालाच्या आधारे, बोर्डाने ठरवलेल्या कट ऑफच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांसाठीच घेतली जाईल.

३. त्यानंतर (पेपर-I + पेपर-II + पेपर-III) मध्ये मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित, उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिसूचनादेखील तपासून पाहू शकतात…

लिंक :

https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTGRBDRGENERALDEPRDSIMPY202414FE01A03453453BAD9BFF7EDD198B90.PDF –

तर अशाप्रकारे उमेदवार या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत…