TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई अंतर्गत नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. अर्ज प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे असणार आहे. तसेच निवडलेल्या उमेदवारांना १५ दिवसाच्या आतमध्ये नोकरी जॉईन करावी लागणार आहे. चला तर मग जाणून घ्या भारतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

उमेदवारांकडून “DH पर्यवेक्षक” च्या एका पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सुरुवातीला हा करार एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल. कामाच्या आधारावर हा करार वाढवला जाईल.

शैक्षणिक पात्रता –

१) अर्ज करणाऱ्या उमेदवारांने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (किमान ६० टक्के गुण ) आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून हॉटेल मॅनेजमेंटचे प्रमाणपत्र असावे.

२) मोठ्या हॉटेल/वसतिगृह/कॅन्टीनमध्ये पर्यवेक्षक म्हणून तीन वर्षांचा कामाचा अनुभव.

हेही वाचा…South Eastern Railway recruitment 2024 : दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत होणार मेगा भरती! पाहा माहिती

अर्ज फी –

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये ऑनलाईन भरावे लागणार आहेत.
एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना २५० रुपये, महिला अर्जदारांना अर्ज भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

नोकरी ठिकाण – मुंबई

पगार – निवडलेल्या उमेदवारास २८ हजार रुपये महिन्याला पगार दिला जाईल .

अर्ज पद्धती – इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन खाली दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत.

उमेदवारांची निवड कशी होईल ?

उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे http://www.tiss.edu ऑनलाइन अर्ज करावा.
उमेदवारांना ऑनलाइन अर्जाच्या प्रिंट घेणे आवश्यक आहे. कारण – भविष्यातील संदर्भासाठी त्याचा उपयोग होईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखत चाचणीसाठी बोलावण्यात येईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल किंवा मोबाईल फोनवर कळवले जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना TISS मुंबई येथे आयोजित मुलाखतीसाठी उपस्थित रहावे लागेल.

अधिकृत वेबसाईट – https://www.tiss.edu/

अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासून घ्यावी.

लिंक – https://www.tiss.edu/uploads/files/ADVT.-_DH_supervisor_TISS_Mumbai-_16-05-2024_1.pdf