भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे. या लेखामध्ये सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक व आर्थिक घटकामध्ये समाविष्ट कृषीविषयक आयामांचा अभ्यास करण्याची रणनीती पाहू.
पर्यावरणीय घटक
* अभ्यासक्रमातील भौगोलिक संकल्पना एकत्रितपणे अभ्यासल्यानंतर पर्यावरणीय भूगोलातील वैज्ञानिक संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. यातून पूर्वपरीक्षेचा सामान्य अध्ययन पेपर १ मधील पर्यावरण घटकाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होणार आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्नजाळे या बाबी फक्त समजून घेतल्या तरी चालेल. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.
* पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.
* पर्यावरणविषयक कायदे हा पेपर २ चाही घटक आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या अभ्यासावेळी पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच याची तयारी करावी.
मानवी व सामाजिक भूगोल
* मानवी व सामाजिक भूगोलामध्ये वसाहती व स्थलांतर हे मुख्य मुद्दे अभ्यासायचे आहेत. वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवे. नोट्समध्ये स्थानविशिष्ट वसाहती एकत्र, आकाराप्रमाणे डिफाइन केलेल्या एकत्र व आर्थिक दृष्टय़ा डिफाइन केलेल्या एकत्र अभ्यासल्यास बहुविधानी प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत होईल.
* स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इत्यादींच्या दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत आकडेवारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे. त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.
महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
* महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये खनिजे व ऊर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा टेबल फॉरमॉटमध्ये अभ्यास करायचा आहे. टेबलमध्ये सामाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे स्थान, वैशिष्टे, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.
* धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इत्यादी संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळा टेबल पाठ करणे आवश्यक नाही. किल्लेही काही ऐतिहासिक महत्त्वाचे तेवढेच लक्षात घ्यावेत.

कृषीविषयक घटक
* कृषीविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधीच्या टप्प्यामध्ये समजून घेतलेल्या आहेत. पूर्णपणे कृषीविषयक भाग टेबल फॉरमेटमध्ये अभ्यासता येईल. पीकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्व, त्यांचे महत्त्व, त्याचे स्रोत, अभावामुळे होणारे रोग व अतिपुरवठय़ामुळे होणारे रोग तसेच इतर आनुषंगिक मुद्दय़ांच्या आधारे टेबल तयार करता येईल.
* महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. प्रत्येक हवामान विभागातील पर्जन्याचे स्वरूप, मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यास स्वरूप, समस्या, कारणे, उपाय या चार पलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नसíगक स्थान, स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीकपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, औद्योगिक व इतर प्रदूषणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
* प्रत्येक कृषी हवामान विभागाचा अभ्यास करतानाच महाराष्ट्रातील शेती, कोरडवाहू, जिरायती, सिंचित शेती इत्यादीचा अभ्यास पूर्ण होणार आहे. यामध्ये घटकांचे एकमेकांशी असलेले परस्परसंबंध समजून घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इत्यादी बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकांशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल.
* शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुद्ध वापर करणे आवश्यक आहे.
दूरसंवेदन
* दूरसंवेदन हा भौगोलिक-तंत्रज्ञानात्मक घटक आहे. भारतीय दूरसंवेदी उपग्रह, त्यांच्या निर्मितीचे टप्पे, प्रस्तावित नवे उपग्रह या तथ्यात्मक माहितीबरोबरच उपग्रहांच्या कार्यपद्धती, त्यांचा वापर, प्रक्षेपण प्रणाली व त्यांचा उपयोग या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
चालू घडामोडी
* चालू घडामोडींपैकी ज्या पूर्णपणे भौगोलिक घटना आहेत त्यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याच वेळी संबंधित मूलभूत संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात. पूर्णपणे भौगोलिक चालू घडामोडींशिवाय पर्यावरण संबंधी चालू घडामोडींमध्ये त्यांचा भौगोलिक पैलू महत्त्वाचा असतो.
* कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी. एम. बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
* दूरसंवेदन क्षेत्रातील चालू घडामोडी इंडिया ईयर बुक व इंटरनेटवरून पाहाव्या लागतील.
* पेपर ४ मधील आपत्ती व्यवस्थापन हा चालू घडामोडींचा भाग नसíगक आपत्तींच्या अनुषंगाने भूगोलाच्या अभ्यासात समाविष्ट करायला हवा.
रोहिणी शहा

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण