बिबट्याच्या एक महिन्याच्या बछड्याची विमानतळावरून सुटका करण्यात आली. हा बछडा एका प्रवाशाच्या सामानत असलेल्या पिशवीत होता. आता या बिबट्याच्या पिल्लाची रवानगी अरिनगर अण्णा झुओलॉजिकल पार्क चेन्नईमध्ये करण्यात आली आहे. या पिल्लाची तस्करी चालली असावी असा संशय व्यक्त होतो आहे. तर ज्या प्रवाशाच्या सामानात हे पिल्लू सापडलं त्या प्रवाशाला तामिळनाडू वन विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

चेन्नई विमानतळावरच्या एअर इंटिलिजन्स विभागाने ही कारवाई केली आहे. एका प्रवाशाच्या सामानात काही आक्षेपार्ह वस्तू असल्याचे या विभागाला वाटले. त्यानुसार या प्रवाशाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर या प्रवाशाचे सामान तपासण्यात आले. ज्यामध्ये बिबट्याचे एक पिल्लू आढळले. या पिल्लाची सुटका करण्यात आली आहे. या प्रवाशाचे नाव काय ते अद्याप समजू शकलेले नाही.