News Flash

लष्करी तळावर हल्ला, दहशतवादी ठार

लष्कराने प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला, यात एक दहशतवादी ठार झाला.

संग्रहित

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्य़ात लष्करी तळावर रविवारी दहशवाद्यांनी हल्ला केला. लष्कराने प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला, यात एक दहशतवादी ठार झाला. शोपियानमधील पिंजोरा परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशवाद्यांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत दहशतवादी हल्यांमध्ये वाढ झाली असून फेब्रुवारीमध्ये सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात सहा जवान शहीद झाले होते. लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 3:38 am

Web Title: attack of the military camp in shopian district
Next Stories
1 ईशान्य विजयाचे श्रेय मोदी, शहांनाच- आदित्यनाथ
2 व्हॉट्सअ‍ॅप संदेश आता ७० मिनिटांनीही काढता येणार
3 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांच्या वाहनांनाही यापुढे नंबर प्लेट
Just Now!
X